Uber | Representational Image | (Photo Credits: ANI)

टॅक्सी बुकिंगची सेवा देणारी Uber कंपनीने आता देशभरात 24 तास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइन सुरु केली आहे. कंपनीने मंगळवारी याबाबत महिती दिली असून हेल्पलाइनच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान गाडी खराब होणे, चालकासोबत वाद, गैरवर्तवणुक याबाबत फोन करुन त्याची तक्रार व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून करता येणार आहे. यापूर्वी कंपनीने हेल्पाइन मध्ये फक्त टेक्स मेसेज करण्याचे ऑप्शन देण्यात आले होते. मात्र आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलची सुविधा प्रवाशाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या कंपनीने त्यांच्या अॅपच्या माध्यमातूनच याबाबत एक ऑप्शन दिले होते. तसेच अॅपमध्ये प्रवाशाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देता त्यात SOS ऑप्शन देण्यात आला असून आकस्मित स्थितीत तत्काळ पोलिसांना घडलेल्या प्रकाराबद्दल सांगण्याची सुविधा उपलब्ध करुन देतो. हेल्पलाइन फिचर कंपनी मार्च पासून चंदीगढ येथे प्राथमिक स्वरुपात त्याची चाचणी करण्यात आली होती. मात्र आता भारतामधील जवळजवळ 40 शहरात ही उबरने या फिचरची सुविधा प्रवाशांना सुरु करुन दिली आहे.(Uber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून कॅब बुकिंगची सोय देणार)

अमेरिका आणि कॅनडा मध्ये ही सुविधा यापूर्वीच कंपनीने तेथील नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, ही सुविधा सुरुवातील हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रवाशाला देण्यात येणार आहे. परंतु 'उबर लाइटवर' (Uber Light) ही सुविधा उपलब्ध नाही आहे.