मुंबईमध्ये रिक्षा, टॅक्सीचालकांच्या मुजोरीला कंटाळून अनेकांनी अॅप बेस्ड टॅक्सी आणि रिक्षा यांची सुविधा पुरवणार्या ओला(Ola), उबर (Uber) अशा सेवांचा मार्ग निवडला. आता भारतामध्ये उबर आपली सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यसाठी कॉल आणि एसएमएसच्या आधारे कॅब बुकिंगची सेवा उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी उबर (Uber) आता खास कॉल सेंटर उभारणार आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेत आणि इंटरनेट कनेक्शन शिवायही ग्राहकांना उबर कॅब (Uber Cab) बुक करण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
'उबर' च्या अधिकार्यांनी बिझनेस लाईन सोबत बोलताना त्यांच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. त्यानुसार ऑफलाईन स्वरूपात उबर कॅब सेवा सुरू करण्याच्या सोयीमुळे वृद्धांना आता हे सुकर होणार आहे. सध्या या प्रयोगाचं टेस्टिंग सुरू आहे.
ओला या उबरच्या प्रतिस्पर्धी कंपनीने काही वर्षांपूर्वी कॉल सेंटर उभारली होती. मात्र भारतामध्ये उबर ची सेवा सुरू होताच कॉल सेंटर बंद करण्यात आली होती. त्यामुळे आता किफायतशीरपणे भारतात ओला कॅबचं आव्हान स्विकारत उबरला कॉलिंग सेंटर सुरू करणं हे देखील एक मोठं अव्हान असेल.