
फेस्टिव्ह सीजन अधिक खास बनवण्यासाठी भारतातील सर्वाधिक मोठी कमर्शिअल वाहन निर्माती कंपनी Tata Motors यांनी इंडियाची दुसरी दिवाळी नावाचे एक ऑफर सुरु केली आहे. गेल्या वर्षात सुद्धा अशाच पद्धतीची ऑफर त्यांनी आणली होती. तर यंदाच्या कंपनीच्या या ऑफर मध्ये ग्राहकांना स्मॉल व्हिकल आणि पिक अप रेंजच्या ग्राहकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून एक बक्षिस दिले जाणार आहे. पिक अप रेंजमध्ये टाटा एस, टाटा योद्धा आणि टाटा इंट्रा यांचा समावेश आहे. त्याचसोबत काही नवे आकर्षक कंज्युमर ऑफर्स सुद्धा दिले जाणार आहेत. टाटा मोटर्स यांच्या या बंपर ऑफर मध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे गोल्ड वाउचर ते एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन आणि फ्युअल वाउचर यांचा समावेश असणार आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबर पर्यंत कायम असणार आहे.
कंपनीने ही ऑफर त्यांची 15 वर्षपूर्ती झाल्याच्या कारणास्तव आणली आहे. टाटा ऐस 22 लाखांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केल्याने ती नंबर 1 ब्रँन्ड ठरली आहे. तसेच 50 हजारांहून अधिक बीएस 6 एससीवी वाहने आधीपासूनच रस्त्यांवर धावत आहेत. वाहनांच्या नव्या रेंजमध्ये नवे तंत्रज्ञान, अधिक आरामदायी केबिन, उत्तम इंधन सारखे फिचर्स दिले जात असल्याने त्याचा ग्राहकांना अधिक फायदा होत आहे.(Honda कंपनी फेस्टिव्ह सीजनमध्ये कार खरेदीवर देतेय 2.5 लाख रुपयांपर्यंत डिस्कउंट, जाणून घ्या अधिक)
दरम्यान, टाटा मोटर्स यांनी दिवाळी दरम्यान, कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आणली होती. त्यानुसार, केवळ 799 रुपयांचा EMI भरून तुम्ही नवी कार खरेदी करु शकता. यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे यासाठी टाटा मोटर्सने HDFC बँकेशी करार केला आहे. कमीतकमी ईएमआय भरून कार खरेदी करता येणार असल्याने ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे कंपनीकडून सांगण्यात आले होते.