Honda कंपनी फेस्टिव्ह सीजनमध्ये कार खरेदीवर देतेय 2.5 लाख रुपयांपर्यंत डिस्कउंट, जाणून घ्या अधिक
Honda Amaze (Photo Credits-Twitter)

Honda Cars Offers: फेस्टिव्ह सीजनवर सर्व कार निर्माती कंपन्या विक्री वाढवण्यासाठी डिस्काउंट आणि ऑफर्स घेऊन आले आहेत. याच दरम्यान, देशातील नामांकित कार निर्माता कंपनी Honda Cars India यांनी सुद्धा आपल्या कारच्या खरेदीवर भारी डिस्काउंट देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तुम्ही जर होंडाची एखादी दमदार कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तर येथे जाणून घ्या कंपनी फेस्टिव्ह सीजनमध्ये कार खरेदीवर 2.5 लाखापर्यंत डिस्काउंट देण्यासह अन्य कोणत्या ऑफर्स देणार आहे.

होंडा अमेझच्या खरेदीवर कंपनी 47 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देणार आहे. यामधील पेट्रोल वेरियंटवर 12 हजार रुपयांसह चौथ्या आणि पाचव्या वर्षात एक्सटेंड वॉरंटी 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि जुन्या कारच्या एक्सचेंजवर 15 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे. तर अमेझजच्या डिझेल वेरियंटवर 12 हजार रुपये किंमतीच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षात एक्सटेंड वॉरंटी 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांचा डिस्काउंट जुन्या कारवर दिला जाणार आहे.(TVS Jupiter वर बंपर दिवाळी ऑफर, Buy Now Pay Later सह कॅशबॅक ही मिळणार)

तसेच होंडा अमेझच्या स्पेशल अॅडिशनच्या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या कारवर 7 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळणार असून जुन्या कारवरच्या एक्सचेंजवर 15 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.(Maruti S-cross चे कंपनीने लॉन्च केले लिमिटेड Addition, किंमत 8.56 लाख रुपये)

त्याचसोबत होंडा सिटी कारच्या खरेदीवर 30 हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. एक्सचेंजवरही कंपनी तेवढाच डिस्काउंट दिला जाणार आहे. तर नव्या होंडा डब्लूआर वी च्या खरेदीवर 40 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या कार खरेदीवर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट ही मिळणार आहे. तर कार एक्सेंजवर 15 हजारापर्यंत अतिरिक्त डिस्काउंट ही दिला जाणार आहे.