भारतात सणासुदीचे दिवस सुरु होणार असल्याने कार निर्मात्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स घेऊन येत आहेत. याच दरम्यानत आता देशातील सर्वाधिक मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती यांनी S-Cross मध्ये नव्या वेरियंटचा समावेश केला आहे. दरम्यान, 2020 मारुती एक-क्रॉस सध्या सिग्मा, डेल्टा, जेटा आणि अल्फा अशा चार वेरियंटमध्ये उतरवली जाते. त्याची किंमत 8.39 लाख ते 12.39 लाख रुपयांदरम्यान आहे. तर सणासुदीच्या दिवसात ग्राहकांसाठी त्यांनी ऑफर आणत एस-क्रॉस Sigma Plus नवे स्पेशल अॅडिशन उतरवले आहे. (Tata Altroz: लवकरच लॉन्च होणार देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 300km चे अंतर कापणार)
मारुती सुजुकी एक क्रॉस Sigma Plus मध्ये 36,997 रुपयांच्या किंमतीच्या एक्ससरीजचा समावेश आहे. जे या कारच्या लूकला आधीपेक्षा आधिक उत्तम बनवतात. एक्ससरीज S-Cross किट असे म्हटले जाते. ज्यामध्ये 4 स्पीकर, कॅमेरा, फॉग लॅम्प आणि व्हिल कवर सोबत पार्सल ट्रे आणि स्पॉइलरचा समावेश आहे. एस-क्रॉस सिगमा प्लसमध्ये सहभागी असलेल्या एक्ससरीजची किंमत 36 हजार रुपये आहे. पण कंपनी यावर डिस्काउंट देत आहे. त्यानंतर ती 29,597 किंमतीत येणार आहे. (वाहन चालकांना आता Driving License आणि RC सारखी महत्वाची कागपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही, स्मार्टफोनच्या माध्यमातून अशा पद्धतीने करा Access)
Maruti Suzuki S Cross ही कंपनीच्या प्रीमियम नेक्सा डीलरशीपच्या माध्यमातून विक्री केली जाते. ही नेक्सा डीलरशीपच्या माध्यमातून विक्री केली जाणारे पहिले प्रोडक्ट होते. सध्या ही कार ब्लू, कॅफीन ब्राउन, ग्रेनाइट ग्रे, पर्ल आर्कटिक व्हाइट आणि प्रीमियम सिल्वर अशा पाच रंगत उपलब्ध आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्रोजेक्टर हेडलाइट आणि एलई़डी टेल लॅम्प, रिवर्स पार्किंग कॅमेरा कव्हर, ड्युअल टोन अलॉय व्हिल यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त यामध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि किलेस एन्ट्र ऑप्शन दिले गेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कारमध्ये रियर पार्किंग कॅमेरा, ABS आणि EBD सुद्धा मिळणार आहे.