Tata Motors logo | (File Photo)

देशातील प्रसिद्ध वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) भारतात त्यांची प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे इलेक्ट्रिक वर्जन लॉन्च करणार आहे. Tigor आणि Nexon नंतर अल्ट्रोज कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे. तर कंपनीने नेक्सॉन ईवी हिला देशातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात देशात सर्वाधिक या इलेक्ट्रिकची विक्री केली गेली.  सध्या टाटा मोटर्स देशात आणखी एक स्वस्त इलेक्ट्रिक कार लवरच लॉन्च करण्याची तयारी करत आहे. जी बाजारात एका मोठ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी सक्षम असणार आहे.

अल्ट्रोजच्या इलेक्ट्रिक वर्जन सर्वात प्रथम 2019 मध्ये जिनिव्हा मोटर शो मध्ये झळकवली होती.  कंपनीने या हॅचबॅकला भारतात 2020 ऑटो एक्सपो मध्ये सुद्धा दिसून आली होती.  अल्ट्रोज ईवी टाटाची जिपट्रॉन इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही दुसरी कार असणार आहे. जी लॉन्च केल्यानंतर भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणारी पहिलीच इलेक्ट्रिक प्रीमियम  हॅचबॅक ठरणार आहे. (Maruti Brezza आणि Hyundai Venue ला टक्कर देण्यासाठी येणार Citroen ची नवी कार, जाणून घ्या अधिक)

कंपनीच्या मते यामध्ये IP67 रेटेड डस्ट आणि वॉटपप्रुफ बॅटरीचा वापर केला जाणार आहे. तर फास्ट चार्जिंग क्षमतेसह जवळजवळ 300 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. सद्यच्या घडीला नेक्सॉन ईवी सिंगल चार्जमध्ये जवळजवळ 312 किमीची रेंज देणार आहे. तर टाटा अल्ट्रोज सध्या 5.44 लाख रुपयांत खरेदी करता येणार आहे.