Maruti Brezza आणि Hyundai Venue ला टक्कर देण्यासाठी येणार Citroen ची नवी कार, जाणून घ्या अधिक
(Photo Credits- Twitter)

भारतात वाढती सब-कॉम्पॅक्ट एसयुवीची (Sub Compact SUV) डिमांड यामुळे वाहन निर्माती कंपन्या सातत्याने याच्या सेगमेंट मधील आपली वाहने उतवरत आहेत. याच पार्श्वभुमीवर फ्रान्स मधील वाहन निर्माती कंपनी Group PSA ने त्यांची Citroen ब्रॅंन्ड पूर्वीची मॉडेल (कोडेन Citroen C21) सोबत या सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याची तयारी करत आहे. ही कार नुकतीच एका टेस्टिंगच्या वेळी दिसून आली.(Audi Q2 Booking: ऑडी ने सुरु केली सर्वात स्वस्त असलेल्या एसयवी क्यू2 ची बुकिंग, जाणून घ्या लॉन्चिंगबद्दल अधिक)

C21 ही कंपनीच्या नव्या कॉमन मॉड्युल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनीची पहिली मेड-इन-इंडिया मॉडेल असणार आहे. जी साउथ अमेरिकेतील बाजारात लॉन्च केली जाणार आहे. डिझाउइन बद्दल बोलायचे झाल्यास सिट्रो सी21 मध्ये कंपनीची सिग्नेटर ग्रिलसह टू-टायर हँडलॅम्प, चंकी अलॉय व्हिल आणि साइडला ब्लॅक कॅडलिंग दिली जाणार आहे. ही कार भारतात फक्त 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह उतरवण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात Citroen Berlingo MPV ही सुद्धा टेस्टिंग वेळी भारतात दिसून आली होती. त्यामध्ये पॉवरट्रेन 1.2 लीटरचे ऑप्शन दिले गेले होते. रिपोर्टनुसार, Citroen ची 1.2 लीटर टर्बो पेट्रोल मोटर इंधन किफायती आणि मारुती सुजुकीच्या इंजिन प्रमाणेच रिफाइंड आहे. त्यामुळे या इंजिनचा वापर कंपनी बहुतांश गाड्यांमध्ये करते. सुरुवातीला सब-कॉम्पैक्ट एसयुवी फक्त 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उतरवली जाऊ शकते. येत्या काळात एमएमटी गिअरबॉक्स सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.(कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास 5 लाखांहून कमी किंमती मधील 'या' हॅचबॅक गाड्यांबद्दल जरुर जाणून घ्या)

भारतात Citroen C21 त्यांच्या सेगमेंटमध्ये Kia Sonet, Hyundai Venue, Maruti Suzuki Vitara Brezza, Ford EcoSport, Tata Nexon आणि Mahindra XUV300 सारख्या कारला टक्कर देणारी ठरणार आहे. सध्या या कारच्या किंमती संदर्भात खुलासा करण्यात आलेला नाही.