टीवीएस ज्युपिटर (Photo Credits-Twitter)

फेस्टिव्ह सीजन मध्ये TVS Motor Comapny त्यांनी बेस्ट सेलिंग स्कूटरवर दमदार ऑफर दिली जात आहे. सणासुदीच्या काळात तुम्ही जर TVS Jupiter वर शानदार ऑफरचा फायदा घेऊ शकता. कंपनी झीरो फायनान्स ते कॅशबॅक पर्यंतची स्किम उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ज्युपिटर स्कूटरवर कोणत्याही प्रकारे डाऊन पेमेंट करता येणार नाही आहे. या व्यतिरिक्त बँक ऑफ बडोदा किंवा ICICI डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.(बाइक आणि स्कूटरचा Insurance काढण्यापूर्वी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान)

कंपनी ही ऑफर अधिक शानदार बनवण्यासाठी कंपनीने Low EMI ऑप्शन देत आहे. ही स्कुटर ग्राहकांना 2,222 रुपये प्रति महिना EMI ऑप्शनसह खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीकडून ग्राहकांना 4500 रुपयांपर्यंत पेटीएम कॅशबॅक ही दिला जाणार आहे.

टीवीएस कंपनीच्या या स्कूटरमध्ये युएसबी चार्जर, फ्रंटला स्टोरेज स्पेस आणि टिंटेड वायजर दिले गेले आहे. ज्युपिटर क्लासिक मध्ये 110cc चे इंजिन ही देण्यात आलेले आहे. बीएस4 वर्जन मध्ये हे इंजिन 7.9bhp ची पॉवर आणि 8.4Nm पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच ज्युपिटर क्लासिक ईटी-एफआय स्कुटर विविध कलर ऑप्शन मध्ये ही उपलब्ध आहे. यामध्ये सनलाइट आयवरी, ऑटम ब्राउन आणि नव्याा इंडिब्लू शेडचा समावेश आहे.(Hero Splendor Plus चे नवे Edition भारतात लॉन्च, ग्राहकांना आपल्या पसंदीचे ग्राफिक्स निवडण्याचा मिळणार ऑप्शन)

दरम्यान,  या वर्षाच्या सुरुवातीला TVS ने आपली नवीन TVS Apache RR 310 चे बीएस-6 हे मॉडेल लाँच केले होते. हे मॉडल खूपच आकर्षित आणि आधीच्या मॉडलपेक्षा थोडे हटके बनविण्यात आले आहे. ही नवीन बाइक अपाची रेड एक्सेंट्ससह काळ्या आणि करड्या रंगामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच याला थोडा स्पोर्टी बाइकचा टच देण्यात आला आहे. या बाइकचा टॉप स्पीड 310 असून 0 ते 60 किमी प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 2.9 सेकंदांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.तसेच या बाईकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी प्लस फिचरचा समावेश करण्यात आला आहे.