Hero Splendor Plus(Photo Credits: Twitter)

Hero Splendor Special Edition: हिरो मोटोकॉर्प यांनी फेस्टिव सीजन पूर्वी त्यांची लोकप्रिय बाइक स्प्लेंडर प्लसचे स्पेशल अॅडिशन उतरवले आहे. स्प्लेंडर प्लस हे अॅडिशन ब्लॅक आणि एक्सेंट रंगात झळकवले असून त्याची किंमत 64,4470 रुपये आहे. तर बाइकच्या स्पेशल अॅडिशनमध्ये तीन ग्राफिक्स ऑप्शन दिले गेले आहे. जे हिरो कोलॅब्स प्रतियोगिता माध्यमातून निवडले गेले आहे. तर बाइकची खरेदी करताना कंपनी ग्राहकांना आपल्या पसंदीचे ग्राफिक्स निवडण्याचा ऑप्शन देणार आहे.(Bajaj Pulsar 125 चे स्वस्त मॉडेल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत)

स्प्लेंडर स्पेशल अॅडिशनमद्ये ग्राफिस मनासारखे निवडता येणार आहेत. हिरो कोलेब्स प्रतियोगितेच्या माध्यमातून निवडलेले अन्य ग्राफिक्समध्ये जुगनू गोल्ड थीम मॉडेलमध्ये बिकनी फेयरिंग, फ्यूल टँक एरिया, टेलपीस आणि साइड पॅनलवर गोल्ड शेड दिली आहे. तर बीटल रेड थीमचे वेरियंच व्हाइट स्ट्राइकसह येणार आहे. ज्यामध्ये पिवळे डीकलचा ऑप्शन दिला गेला आहे. इंधनाचा टँक आणि साइड पॅनलवर लहान लाइन्स सुद्धा आहेत.

हिरोच्या या नव्या अॅडिशनमध्ये ब्लॅक आणि एक्सेंट वर्जन पूर्णपणे ऑल ब्लॅक रुपात येणार आहे. ज्यामध्ये अलॉय व्हिल, चेन कव्हर आणि इंजिनवर काळ्या रंगाचे फिनिशिंग दिले गेले आहे. या व्यतिरिक्त बाइकमध्ये अन्य कोणताही नवा बदल करण्यात आलेला नाही. स्प्लेंडर प्लसच्या स्पेशल अॅडिशची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जवळजवळ 899 रुपयांनी अधिक आहे. तसेच ग्राहकांना याची संपूर्ण किट 1399 रुपयांत स्वतंत्रपणे खरेदी करु शकतात.(Honda H'ness CB350 : होंडा कंपनीने लॉन्च केली रेट्रो बाईक; Royal Enfield Classic 350 ला टक्कर देणारी ठरणार)

बाइकच्या इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये BS6 कम्पालइंट 97.2cc एअर कूल्ड इंजिन दिले गेले आहे. जे 7.9bhp ची पॉवर आणि 8.05Nm चे टॉर्क देणार आहे. यामध्ये ट्रान्समिशन ड्युटीवर 4 स्पीड गिअरबॉक्स जोडले आहे.