Honda H'ness CB350 : होंडा कंपनीने लॉन्च केली रेट्रो बाईक; Royal Enfield Classic 350 ला टक्कर देणारी ठरणार
Honda H'ness CB350 (Photo Credits-Twitter)

होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) यांनी भारतात त्यांची नवी रेट्रो-क्लासिक रोडस्टार बाईक लॉन्च केली आहे. त्याला H'ness असे नाव ठेवले आहे. दरम्यान Honda H'ness CB350 ची किंमत जवळजवळ 1.9 लाख एक्स शो रुम किंमत आहे. भारतात ही बाईकचा थेट मुकाबला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सोबत होणार आहे. Honda H’ness CB 350 ही मोटरसायकल मध्ये दोन वेरियंट DLX आणि DLX Pro लॉन्च केली आहे. कंपनीच्या नुसार, H'ness CB350 एक All New CB मोटरसायकल आहे. जी खासकरुन भारतीय बाजारासाठी तयार करण्यात आली आहे. ही मोटरसायकल होंडाची प्रिमियम डिलरशिप बिग विंगच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. त्याचसोबत कंपनीने असा सुद्धा खुलासा केला आहे की, भारतात H'Ness CB350 ही पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.(Honda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल)

या बाइकचा एक प्रोटोटाइप उद्यापासून गुरुग्राम, मुंबई, बंगळुरु, कोची आणि भिलाई मधील होंडा बिग विंगच्या डिलरशीपमध्ये उपलब्ध असणार आहे. तर कंपनीने याची बुकिंग सुद्धा सुरु केली आहे. डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास Honda H'Ness एक रेट्रो रोडस्टार बाईक आहे. ज्यामध्ये गोल हेडलॅम्प, लांब हँडलबार, टियरड्रॉप शेपचे इंधन टँक, स्प्लिट सीट, क्रोम क्रैककेस आणि एग्जॉस्ट पाइपसह ब्लॅक मॅनेकनिकल बिट्स दिले आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये अलॉय व्हिल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि क्रोम मिरर्स सुद्धा मिळणार आहेत.(Honda कंपनीच्या प्रीमियम सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट, जाणून घ्या खासियत)

होंडा कंपनीच्या या नव्या बाईकच्या फिचर्सबद्दल माहिती द्यायची झाल्यास त्या मध्ये एक सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल दिला आहे. स्पीड, टॅकोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्यूल गेज, एकूण इंधन दक्षता सारखी माहिती मिळणार आहे. या फिचर्स व्यतिरिक्त ऑल न्यू H'Ness CB350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, होंडा स्मार्टफोन वॉइस कंट्रोल सिस्टिम, होंडा सेलेक्टेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम आणि डुअल-चॅनल एबीएस यांचा समावेश आहे.