Honda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल
अॅक्टीव्हा (Photo Credit: Twitter)

होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) आपल्या प्रोडक्टसचा ऑनलाईन सेल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. लॉकडाउननंकर सर्व ऑटोमोबाईल ब्रॅन्ड्सनी ऑनलाईन सेलवर अधिक भर दिला असून ग्राहकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन ग्राहक घरबसल्या आपल्यासाठी गाडी बुकिंग करत असून त्यांना त्यावर शानदार बोनस आणि ऑफर सुद्धा दिली जात आहे. होंडा अॅक्टिव्हा आणि ग्राजियाच्या ऑनलाईन खरेदीवर कंपनी 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर करत आहे. हा कॅशबॅक फेडरल बँकेचे कार्ड वापरुन EMI पेमेंटसाठी वापरु शकणार आहात. पण जर तुम्ही पुर्ण पेमेंट करणार असल्यास तुम्हाला बँक ऑफ बडोदा कार्डच्या माध्यमातून ही तेवढाच कॅशबॅक दिला जाणार आहे.

BS6 होंडा ग्राजिया मध्ये BS6 अॅक्टिव्हा व्यतिरिक्त 125 चे इंजिन दिले आहे. ग्राजियाचे इंजिन 6000RPM वर 8.14bhp ची पॉवर आणि 5000rpm वर 10.3Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. दरम्यान, अॅक्टिव्हा 125 मध्ये देण्यात आलेले हे इंजिन 6500rpm वर 8.18hp ची पॉवर आणि 5000rpm वर 10.3Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. होंडाच्या या दोन्ही स्कूटरमध्ये सर्वात मोठा फरक त्यांच्या डिझाइनमध्ये आहे. अॅक्टिव्हा 125 अधिक कम्युटर-सेंट्रिक आहे. तर ग्राजियाचे लूक स्पोर्टी आहे. अॅक्टिव्हा 125 चे वजन 111 किलोग्रॅम आणि ग्राजियाचे वजन 108 किलोग्रॅम आहे.(Honda कंपनीच्या प्रीमियम सेडानवर दिला जातोय 2.50 लाखांचा कॅश डिस्काउंट, जाणून घ्या खासियत)

अॅक्टिव्हा 6जी चे इंजिन 8,000rpm वर 7.86bhp ची पॉवर आणि 5250rpm वर 8.79Nm पीक टॉर्क जनरेट करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, नव्या अॅक्टिव्हा मध्ये जुन्या मॉडेल पासून 10 टक्के अधिक मायलेज मिळणार आहे. अॅक्टिव्हा 5जी च्या तुलनेत अॅक्टिव्हा 6जी पॉवर थोडी कमी आहे. अॅक्टिव्हा 5जी मध्ये दिलेले बीएस4 इंजिन 7.96hp ची पॉवर जनरेट करणार आहे.