Pulsar 125 split seat (Photo Credits-Twitter)

Bajaj Auto ने नुकतीच त्यांची Pulsar 125 लाइनअप मध्ये आणखी एक नवे वेरियंट उतरवले आहे. ते म्हणजे पल्सर 125 स्प्लिट सीट ड्रम वेरियंट आहे. त्याची किंमत 73,274 रुपये आहे. या बाइकच्या एक्सटीरियर्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यासाठी स्पोर्टी स्प्लिट सीट सेटअप सह स्प्लिट ग्रॅब रेल्स, इंजिन काउल, बॉडी ग्राफिक्स, हॅलोजन हेडलॅम्प, द्विन DRLs सारखे फिचर्स दिले आहेत. त्याचसोबत ही बाइक दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करुन दिली आह. त्यात ब्लॅक रेड आणि ब्लॅक सिल्वर रंगाचा समावेश आहे.(Mahindra XUV500 Car: कमी पैशात चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 'महिंद्रा एक्सयूव्ही 500' ठरू शकते बेस्ट ऑपशन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

या बाइकच्या इंजिन आणि पॉवर बद्दल अधिक माहिती द्यायचे झाल्यास त्यासाठी 12.4cc चा सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 11.64 PS च्या मॅक्सिमम पॉवर आणि 10.8Nm वर पीक टॉर्क जनरेट करणार आहे. तसेच 5 स्पीड गिअरबॉक्स लेस आहे. पल्सर 125 स्प्लिट सीट ड्रमच्या फ्रंटला कन्वेंशनल टेलिस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये गॅस शॉक अॅब्जॉर्बर्स दिले गेले आहे.

नव्या वेरियंटची किंमत अधिक स्वस्त आहे. तर ही बाइक फेस्टिव्ह सीजन मध्ये विक्री वाढवण्यासाठी कंपनीला फायदेशीर ठरु शकते. कंपनीने नुकत्याच त्यांच्या काही निवडक मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट सुद्धा ऑफर केला आहे. कंपनीचा मुख्य फोकस हा बाइक्सची विक्री वाढवण्यावर आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी 3 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.(MG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू)

याआधी बजाज कंपनीने भारतीय बाजारात Bajaj Avenger Street 160 ची किंमतीत वाढ केली होती. तर  बाइकच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास बजाज अॅव्हेंजर स्ट्रिट 160 मध्ये 160cc द्विन स्पार्क, 2 वेल्व, एअर कूल्ड DTS-i इंजिन दिले गेले आहे. जी 8500Rpm वर 14.8bhp ची पॉवर आणि 7000Rpm वर 13.5Nm वर टॉर्क जनरेट करणार आहे. डायमेंशन बद्दल बोलायचे झाल्यास Bajaj Avenger Street 160 ची लांबी 2210 mm, रुंदी 806mm, उंची 1070mm, व्हिलबेस 1480mm, ग्राउंड क्लिअरेंस 177mm, एकूण वजन 150 किलो लीटरची क्षमतेचा फ्यूल टँक दिला आहे.