Tata Harrier Camo Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमत
Tata Harrier Camo Edition (Photo Credits-Twitter)

टाटा मोटर्स (Tata Motors)  यांनी फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांना खुशखबर देत त्यांची पॉप्युलर एसयुवी टाटा हॅरियरचे कॅमो अॅडिशन (Tata Harrier Camo Edition) लॉन्च केले आहे. जे ग्रीन रंगात अत्यंत जबरस्त दिसून येते. टाटा हॅरियर कॅमो अॅडनिशची सुरुवाती किंमत 16.5 लाख रुपये आहे. XT आणि XZ वेरियंट्स मध्ये लॉन्च टाटा हॅरियरच्या या स्पेशल अॅडिशनच्या इंटीरियार सह फिचर्समध्ये काही खास बदलाव दिसून आले आहेत. टाटा हॅरियर कॅमो अॅडिशनचे XT, XT+,XZ,XZ+ वेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशनसह येणार आहे. तर XZA आणि XZA+ वेरियंट ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येणार आहे.(2020 Hyundai i20 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स)

टाटा हॅरियर कॅमो अॅडिशनच्या मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये XT वेरियंटची किंमत 16.5 लाख रुपये आहे. तर XT+ वेरियंटची किंमत 17.3 लाख रुपये आहे. Tata Harrier XZ Camo वेरियंटची किंमत 17.85 लाख रुपये आहे. तर XZ+ वेरियंटची किंमत 19.10 लाख रुपये आहे. टाटा हॅरियर कॅमो अॅडिशनच्या ऑटोमेटिक वेरियंटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास XZA वेरियंट 19.15 लाख रुपये आणि XZA+ वेरियंट 20.30 लाख रुपये आहे.

कंपनीच्या या स्पेशल अॅडिशनसह एक्सेसरिज किट सुद्धा ऑफर केली जाणार आहे. जी कॅमो स्टेल्थ आणि कॅमो स्टेल्थ प्लस ऑप्शनसह येणार आहे. याची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु आहे. टाटा मोटर्सने त्यांची धासू एसयुवी टाटा हॅरिरय नव्या अवतारात उतरवली आहे. जी नव्या कॅमो ग्रीन कलरमध्ये आकर्षक दिसते. त्याचसोबत नव्या स्टाइल कॅमे बेजिंगमुळे अधिक पॉवरफुल दिसते.

टाटा हॅरियरच्या या खास कॅमो अॅडिशन एसयुवी च्या इंटिरियरला आकर्षक लूक देण्यासाठी बॅकस्टोन मॅट्रिक्स डॅशबोर्ड, कॉन्ट्रास्ट ग्रीन स्टिचच्या प्रीमियम ब्लॅकस्टोन लेदर सीट्स दिल्या आहेत. तसेच बॅक सीट ऑर्गनायझर, सन शेड्स, 3D ट्रक मॅट्स आणि अॅन्टी स्किड डॅश मॅट सारखे इंटिरियर एलिमेंट्स दिले आहे. कॅमो अॅडिशन एक्सटीरियर मध्ये नव्या कॅमो बॅजसह R17 ब्लॅकस्टोन अलॉय व्हिल ही दिले आहे.(Renault Kwid RXL Easy-R भारतातील सर्वाधिक स्वस्त ऑटोमॅटिक कार, किंमत 4.54 लाख रुपये)

तसेच कंपनीच्या या नव्या अॅडिशन कारमध्ये इंजिन ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहे. जी 2.0 लीटर Fiat Sourced टर्बो डिझेल इंडिन आहे. हे इंजिन 170bhp ची पॉवर आणि 350Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. टाटा हॅरियर कॅमो अॅडिशनच्या अन्य फिचर्स बद्दल अधिक माहिती द्यायची झाल्यास त्यामध्ये 7 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टिम दिली गेली आहे. जो अॅन्ड्रॉइ़ ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. तसेच पॅनारोमिक सनरुफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर आणि कॅमेरा, ईबीडीसह ईबीएससह सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स दिले गेले आहेत.