साऊथ कोरियन (South Korean) ऑटो कंपनी (Auto Manufacturer) हुंडाई (Hyundai) ने हुंडाई आय20 (Hyundai i20) भारतात लॉन्च केली आहे. या कारचे बुकींग सुरु झाले असून इच्छुक केवळ 21,000 च्या डाऊनपेमेंट मध्ये कार बुकींग करु शकतात. घरबसल्या देखील तुम्ही ही कार खरेदी करु शकता. यासाठी तुम्हाला हुंडाईच्या क्लिक टू बाय या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला भेट द्यावी लागेल. हुंडाई आय20 साठी कंपनीकडून 5 वर्षांची वॉरंटी देण्यात येत असून 3 वर्षांचे रोडसाईड असिसमेंट, लो कॉस्ट मेनटेन्सस त्याचबरोबर 3 वर्षांची फ्रि ब्लुलिंक आणि पीकअप-ड्राप सर्व्हिस देण्यात येणार आहे.
सर्व नवे आय20 मॉडेल्समध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहे. 1.0-litre turbo GDi पेट्रोल इंजिन 120 bhp पावर जनरेट करत असून 1.2 लिटर 83 hp पावर आणि 115 पीएम टॉर्कचा एनएम जनरेट करतो.
.@HyundaiIndia Hyundai | The all-new i20 | Watch Launch Event Live https://t.co/qPNmiMKKDL
— Hyundai India (@HyundaiIndia) November 5, 2020
सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्या आय20 मध्ये सहा एअर बँग्स, इलेक्ट्रानिक्स स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि हिल स्टार्ट असिस्टन्स देण्यात आले आहेत.
1.5 लीटर डिझेल इंजिन हे फोर सिलेंडर युनिट आहे. जेव्हा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन होते तेव्हा ते 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास धावते. 1.0-लीटर टर्बो इंजिन 6 स्पीड इंटेलिजेट मॅन्युअल ट्रांसमिशनसह देखील उपलब्ध आहे.
कारमध्ये 10.25 इंचाची touchscreen infotainment system अॅनरॉईड ऑटो सह देण्यात आली आहे. कारमध्ये स्मार्टवॉच इंडिकेशन सुविधा गुगल अॅनरॉईड च्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.
हुंडाई आय20 चे 13 प्रकार आहेत. चार ट्रिममध्ये - मॅग्ना, स्पोर्ट्ज, अस्ता आणि अस्ता ओ. 2020 Hyundai i20 च्या बेस वेरिएंटची किंमत 6.5 लाख असून टॉप वेरिएंटची किंमत 10.60 लाख इतकी आहे.