
ओकिनावा कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कुटर ओकिनावा लाइट (Okinawa Lite) नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्कुटर भारतीय बाजाराचा अंदाज घेऊन त्याचे डिझाइन बनवले असल्याचे सांगितले आहे. भारतीय बाजारात या स्कुटरची किंमत 59,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ही इलेक्ट्रिक स्कुटर शहरात कमी अंतर पार करण्यासाठी योग्य पर्याय ठरु शकते असे सुद्धा कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्याचसोबत इकोफ्रेंडली स्कुटर आहे.
कंपनीच्या मते ओकिनावा लाइट इलेक्ट्रिक स्कुटर खासकरुन तरुण आणि महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. स्कुटरमध्ये लीथियम-आयन बॅटरी देण्यात आलीअसून ती डिटॅच करता येऊ शकते. ओकिनावा स्कुटरची बॅटरी आणि मोटारची वॉरिंटी 3 वर्षापर्यंत आहे. तसेच स्कुटरमध्ये वॉटरप्रुफ 250wt BLDC मोटार देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 40 वोल्ट, 1.25KWH लीथियम आयन बॅटरी दिली आहे. जी अॅन्टी थेफ्ट मॅकेनिज्मसोबत येते. इलेक्ट्रिक स्कुटर 25 किमी प्रति तासच्या टॉप स्पीडने धावणार आहे.(10 मिनिटे चार्जिंग केल्यानंतर 320 किमीपर्यंत चालणारी कार; वाचा या नव्या बॅटरीबद्दल)
कंपनीने या इलेक्ट्रिक स्कुटर बाबत अधिक माहिती देत असे सांगितले आहे की, ही एकदा चार्ज केल्यानंतर 50-60 किमी पर्यंतचा पल्ला आरामात गाठू शकते. तसेच 4-5 तासात ही स्कुटर पूर्णपणे चार्ज होते, स्कुटर अॅल्युमिनियम अलॉय वील्ज सोबत लॉन्च करण्यात आली आहे. स्कुटरची लांबी 1790mm आणि रुंदी 710mm, उंची 1190mm आहे. या सेल्फ स्टार्ट स्कुटरमध्ये युएसबी चार्जर सुद्धा देण्यात आले आहे.