10 मिनिटे चार्जिंग केल्यानंतर 320 किमीपर्यंत चालणारी कार; वाचा या नव्या बॅटरीबद्दल
Electric Car (Photo Credits: Pixabey)

इलेकट्रीक कार हा पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीवर उत्तम पर्याय ठरतात. पण हीचं इलेक्ट्रिक कार चार्जिंग करायची म्हटली की त्याला लागणार वेळ कायमच चिंतेचा विषय ठरतो. आता मात्र इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.

आता एक अशी बॅटरी बनवण्यात येत आहे, जी फक्त 10 मिनिटात चार्ज होते. हा दावा केला आहे अमेरिकन शास्त्रज्ञांनी. इतकंच नव्हे तर या 10 मिनिटे चार्जिंग केलेल्या बॅटरीने 320 किमीपर्यंत एखादी इलेक्ट्रिक कार चालू शकते. पण अद्याप तरी ही बॅटरी बनत असल्याने ती बाजारात यायला अजून किमान 10 वर्षे लागतील.

या बॅटरीचं संशोधन करताना, ही बॅटरी 60 डिग्री तापमानापर्यंत चार्ज केली आणि पुन्हा थंड करण्यात आली. या वाढत्या तापमानामुळे ऊर्जा या बॅटरीमध्येचं साठून राहते आणि बॅटरीची कार्यक्षमताही वाढते. तसेच बॅटरी कूलिंग करताना ज्या तंत्रज्ञानाची गरज पडते, त्याचा वापर कारमध्ये असलेल्या कूलिंग सिस्टमच्या माध्यमातून केला जाईल.

Maruti Suzuki ने लॉन्च केली सर्वात स्वत 7 सीटर कार, सेफ्टीसाठी मिळणार 'हे' खास फिचर्स

दरम्यान, सध्या कार वापरण्यात येणाऱ्या बॅटरीच्या चार्जिंगसाठी फास्ट चार्जरने देखील तीन तास आणि सामान्य चार्जरने 6-7 तासही लागतात.