Maruti Suzuki ने लॉन्च केली सर्वात स्वत 7 सीटर कार, सेफ्टीसाठी मिळणार 'हे' खास फिचर्स
Maruti Suzuki Eeco (Photo Credits-Twitter)

देशातील ऑटो सेक्टरमधील प्रसिद्ध ऑटोकंपनी मारुती सुजुकी यांनी त्यांच्या गाड्यांच्या मॉडेलमधील नवी Maruti Suzuki Eeco एका नव्या सेफ्टी फिचर्ससह लॉन्च केली आहे. ही कार 7 सीटर कार असून सामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखी आहे. कारच्या इंजिनबाबत बोलायचे झाल्यास त्यासाठी 1196cc चा 4 सिलेंडर असणारे पेट्रोल डीझल इंजिन देण्यात आले आहे. जे 6000Rpm वर 54Kw पावर आणि 3000Rpm वर 101NM चा टॉर्क जनरेट करतो. गिअरबॉक्समध्ये ही कार 5 स्पीड मॅन्युएल गिअरबॉक्सपेक्षा कमी आहे.

मारुतीच्या मायलेजसाठी प्रति लीटर पेट्रोलसाठी 15.37 किमीचा मायलेज देऊ शकते. तसेच प्रति किली सीएनजी 21.94 किमी मायलेज देणार आहे. ब्रेकिंग सिस्टिमध्ये Eeco च्या फ्रंटला वेंटीलेटीड डिस्क आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. तर सस्पेंशनबाबत Eeco च्या पुढील बाजूस Mac Pherson Strut सस्पेंशन आणि रियरमध्ये 3 लिंक रिगिड सस्पेंशन दिले आहे. या कारची शो रुममधील सुरुवाती किंमत 3,55,205 रुपये ठेवण्यात आली आहे.कारमध्ये सेफ्टी फिचर्ससाठी Eeco मध्ये अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS),EDB, रिवर्स पार्किंग सेंसर, ड्रायव्हर आणि लोको ड्रायव्हर सीट बेल्ट रिमांडर आणि ड्रायव्हर एअरबॅग देण्यात आल्या आहेत.(Maruti Suzuki S-Presso Mini SUV Launch: देशातील सर्वात स्वस्त SUV एस प्रेसो लॉन्च, किंमत, फिचर्स घ्या जाणून)

तर अर्थिक मंदीचा सर्वात मोठ फटका वाहन उत्पादन  क्षेत्रावर बसला असून या क्षेत्रातील मरगळ कायम दिसून आली. वाहन उत्पादन कंपनी मारुती सुझुकीने सलग आठव्या महिन्यातही उत्पादन कपात केली आहे. सध्या बाजारात वाहनांची मागणी कमी होत आहे. यामुळे मारुती सुझुकी कंपनीला त्यांच्या उत्पदनात कपात करावी लागली आहे.