Maruti Suzuki S-Presso Mini SUV Launch: देशातील सर्वात स्वस्त SUV एस प्रेसो लॉन्च, किंमत, फिचर्स घ्या जाणून
Maruti Suzuki S-Presso Mini SUV | (Photo Credits: Maruti Suzuki India)

Maruti Suzuki S-Presso Car India Launch: औद्योगिक क्षेत्रात मंदीसदृश्य वातावरण असतानाही मारुती सुजुकी कंपनीने चारचाकी गाड्यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर दिली आहे. मारुती सुजुकी कंपनीने आपली बहुचर्चीत एसयूवी एस प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) लॉन्च केली आहे. देशातील ही सर्वात स्वस्त एसयूव्ही असल्याचे सांगितले जात आहे. राजधानी दिल्ली येथील एका शोरुममध्ये या गाडीची किंमत 3.69 लाख रुपये तर, हाई व्हर्जनची किंमत 4.91 लाख रुपये इतकी आहे. प्राप्त माहितीनुसार सध्यास्थितीत ही एसयूव्ही केवळ पेट्रोल इंजिनमध्ये बाजारात उतरवली आहे.

Maruti S-Presso व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

Maruti S-Presso चार व्हेरिएंटमध्ये आहे. ज्यात Standard, LXI, VXI, and VXI+ असे पर्याय आहेत. कारमध्ये 10 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. S-Presso ची कॉन्सेप्ट सन 2018 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये मारुती फ्यूचर-एस नावाने प्रसिद्ध करण्यात आले होते.

कंपनीला आशा आहे की, आर्थिक मंदीमध्येसुद्धा ही स्वस्त एसयूव्ही ग्राहकांना विशेष आवडेल. ऑटो क्षेत्रातील जाणकारांचे म्हणने असे की, मारुतीची ही कार रेनॉ क्विड या गाडीशी स्पर्धा करेन. सन 2014 मध्ये मारुतीने लॉन्च केलेली सेलेरिया नंतर पहिली एंट्री लेवल हॅटबॅक आहे. मारुती ही कार दक्षिण अफ्रीका, श्रीलंका आणि अशीयायी देशांमध्ये लॉन्च करणार आहे. (हेही वाचा, खुशखबर! Maruti Suzuki पासून Hyundai पर्यंतच्या गाड्यांवर मिळत आहेत 4 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स)

फिचर्स

  • एसयूव्हीच्या फिचर्सबाबत बोलायचे तर, काळ्या रंगात एस-प्रेसो केबिन
  • टॉप वेरियंट्स मध्ये डैशबोर्ड वर बॉडी कलर इन्सर्ट्स
  • डैशबोर्डची डिजाइन फ्यूचर-एस कॉन्सेप्ट सारखी आहे. डैशबोर्डमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि टेकोमीटर
  • या कारमध्ये मारुति एस-प्रेसो मध्ये10 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स आहेत.

    इंजिन

    मारुती एस-प्रेसो मध्ये 1.0-लीटर चे बीएस6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 67hp ची पॉवर आणि 90Nm टॉर्क जेनरेट करते. इंजन 5-स्पीड मैन्युअल गियरबॉक्स युक्त आहे. ऑटोमेटेड मैन्युअल ट्रासमिशन (AMT) चा पर्यायही दिला आहे. मारुतीचा दावा आहे की, स्टँडर्ड आणि एलएक्सआई व्हेरियंट मध्ये एस-प्रेसोचे माइलेज 21.4 किलोमीटर आणि टॉप व्हेरियंटमध्ये माइलेज 21.7 किलोमीटर प्रति लीटर आहे.