खुशखबर! Maruti Suzuki पासून Hyundai पर्यंतच्या गाड्यांवर मिळत आहेत 4 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
गाड्यांवर भरघोस सूट (संग्रहित संपादित प्रतिमा)

ही संधी कदाचित अनेक दशकांमध्ये आली आहे, जेव्हा आपण आपल्याला हव्या असलेल्या अनोख्या कारचे स्वप्न पूर्ण करू शकत आहात. देशातील आघाडीचे वाहनकर्ते त्यांच्या मोटारींवर लाखो रुपयांची ऑफर देत आहेत. मारुती सुझुकी ते ह्युंदाई पर्यंतच्या कार खरेदीवर आपण तब्बल 4 लाख रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे तुम्ही जर का कार खरेदीचा विचार करत असला तर अशी संधी पुन्हा मिळणे अवघड आहे. चला पाहूया कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे.

  • मारुती सुझुकी (Maruti Suzuki): देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी  मारुती सुझुकीने अलीकडेच जाहीर केले की, आगामी एप्रिल 2020 पासून ते डिझेल कारची निर्मिती करणार नाहीत. त्याचबरोबर, कंपनी आपले सध्याचे मॉडेल नवीन बीएस -6 इंजिनसह अपडेट करीत आहे. अशा परिस्थितीत, बीएस -4 मॉडेल्सचा साठा रिकामा करण्यासाठी तसेच बाजारात मंदी असल्याने कंपनी आपल्या गाड्यांवर भारी सूट देत आहे. कंपनी आपल्या गाड्यांवर 30,000 ते 1.2 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. ज्यामध्ये मारुती अल्टो ते लक्झरी सेडान सियाझ पर्यंतच्या गाड्यांचा समावेश आहे.
  • ह्युंदाई (Hyundai): दुसरीकडे दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईनेही आपल्या कारवर भारी सूट देण्यास सुरुवात केली आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार ग्रँड आय 10 (Grand i10) वर संपूर्ण 15 टक्के सूट देत आहे. ह्युंदाई सॅंट्रो (Hyundai Santro) खरेदी केल्यास आपण संपूर्ण 40,000 रुपये वाचवू शकता. सोबत ग्रँड आय 10 च्या खरेदीवर आपण 85,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता.
  • टोयोटा (Toyota): जपानी वाहन निर्माता टोयोटा त्यांच्या लोकप्रिय सेडान यारीस खरेदीवर तब्बल 2,50,000 रुपयांची सवलत देत आहे. कारच्या शोरूम किंमतीची ही 29 टक्के किंमत आहे. कदाचित कंपनीने यापूर्वी इतकी मोठी सूट कधीच जाहीर केली नव्हती. अलीकडेच कंपनीने टोयोटा यारीस नवीन ड्युअल टोन कलरमध्ये देखील आणले आहे. या कारची किंमत 8.65 लाख ते 14.07 लाख रुपयांपर्यंत आहे. (हेही वाचा: देशातील पहिली AI इनेबल इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; अवघ्या 4 हजारात घेऊन जाऊ शकता घरी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
  • होंडा (Honda): सणासुदीच्या मोसमात होंडा आपल्या मोटारींवरही भारी सूट देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या होंडा सीआर-व्हीवर जास्तीत जास्त 4 लाख रुपयांची सूट देत आहे. दुसरीकडे, होंडा बीआर-व्ही खरेदीवर आपण 1,10,000 रुपयांची बचत करू शकता. यात रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट आहे. कंपनी आपल्या इतर मोटारींवर, 42,000 रुपयांपर्यंतची सूटदेखील देत आहे.
  • रेनो आणि निसान (Renault And Nissan): या दोन कंपन्यांनी त्यांच्या प्रसिद्ध कार कॅप्टर आणि किकची किंमतही दीड लाख रुपयांनी कमी केली आहे. ही सर्व सूट बीएस -4 मानक मॉडेलवर देण्यात येत आहे.(या लेख इन्टरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिला आहे. लेटेस्टली मराठी या माहितीची पुष्टी करता नाही. गाई खरेदी करताना सवलतींची माहिती स्वतः विचारून घ्यावी)