पावसाळ्याच्या वेळी आपण आपल्या आरोग्याबद्दल जशी काळजी घेतो तशीच काळजी वाहानासाठी घेणे आवश्यक असते. चिखल, पाणी आणि घाण यांच्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्याचसोबत पावसाळ्यात वाहन सावधानतेने चालवणे हे फार महत्वाचे आहे.
त्यामुळे पावसाळ्यात वाहन घराबाहेर प्रवासाठी काढताना ते व्यवस्थित कार्यरत आहे की नाही हे तपासून पहावे. तत्पूर्वी गाडीची काळजी घेण्यासाठी हे काम करा. अन्यथा तुमची गाडी खराब होण्याची शक्यता आहे.
-पावसाळ्यात पाणी भरलेल्या ठिकाणाहून गाडी बाहेर काढणे कठीण काम असते. त्यामुळे अशा ठिकाणाहून गाडी काढणे टाळल्यास उत्तम. तर दुसरा मार्ग म्हणजे पाणी भरलेल्या ठिकाणी गाडी हळू चालवावी. तसेच ज्यास्त वेळा गाडी चालू बंद करणे टाळावे.
-गाडीमध्ये बॅटरी ते ऑईलपर्यंतची काळजी नेहमी घ्यावी. परंतु गाडीतील कोणताही पार्ट व्यवस्थित सुरु नसल्यास तो जळून जातो.
-पावसाळ्यात वाइपरची गरज असते. त्यामुळे अशा वेळी गाडी बाहेर काढण्यापूर्वी वाइपर व्यवस्थित आहे की नाही ते पाहावे. कार पार्किंग लाईट, हेट लाईट आणि इंडीकेटर चालू अवस्थेत असणे महत्वाचे आहे.(Avan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी)
या सर्व गोष्टींची प्रथम पावसाळ्यात काळजी घेणे आवश्यक असते. नाहीतर तुम्हाला गाडीसंबंधित ऐन पावसात खुप खर्च येण्याची शक्यता असते.