Koenigsegg Jesko (Photo Credits- Twitter)

जिनेवा (Geneva) येथे सुरु असलेल्या कार शो मध्ये एकापेक्षा एक सरस अशा कार मॉडेल्स पाहायला मिळत आहेत. त्यातील एक म्हणजे Koenigsegg Jesko हायपरकार आहे. या सुपर कारचा लूक आणि परफॉर्मेंस उत्तम असून कारची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.

Koenigsegg Jesko कंपनीची Koenigsegg Agera रिप्लेस केली जाणार आहे. त्यामध्ये V8 पेट्रोल इंजिन दिले आहे जे 1,600hp चे पॉवर आणि 2,177 Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. इंजिनसाठी 9-स्पीड गियरबॉक्स पेक्षा कमी देण्यात आले आहे. या हायपरकारची टॉप स्पीड 483 किलोमीटर प्रति तास अशी आहे.(हेही वाचा-'महिंद्रा'ने सादर केली जगातील सर्वात वेगवान कार; 2 सेकंदात पकडणार 100 KPH गती, पहा वैशिष्ठ्ये)

कंपनीने असा दावा केला आहे की, जेस्कोची 483 किलोमीटर प्रति तास ऑन रोड पार करु शकणार आहे. तर असे झाले तर दोन वर्षांपूर्वीच्या यूएस मधील Koenigsegg Agera ने केलेला रेकॉर्ड तोडण्यात यश मिळणार आहे. तसेच जगातिल सर्वात जास्त वेगवान कार म्हणून ही कार ओळखली जाईल.