 
                                                                 General Motors Layoffs: जगप्रसिद्ध ऑटो कंपनी जनरल मोटर्सने (General Motors) 1000 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या नोकर कपातीमध्ये सॉफ्टवेअर आणि सेवा विभागातील अभियंत्यांचा समावेश असेल. कंपनीने 19 जुलै रोजी याची पुष्टी केली. या टाळेबंदीचा परिणाम वॉरेन, मिशिगन, यूएसए येथे असलेल्या कंपनीच्या टेक कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या सुमारे 600 कर्मचाऱ्यांवर होईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीने जागतिक स्तरावर 1.3% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. गेल्या वर्षी या कंपनीत 76 हजार पगारदार कर्मचारी कार्यरत होते.
जागतिक मंदीचा परिणाम या कंपनीवरही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कंपनीसमोर आणखी आव्हाने वाढली आहेत. आता नवीन शेवरलेट ब्लेझर ईव्ही सॉफ्टवेअर समस्यांना तोंड देत आहे. यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि चार्जिंग एरर मेसेज देखील समाविष्ट आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीने विक्री थांबवण्याची घोषणा केली होती. जनरल मोटर्ससह सर्व वाहन उत्पादकांचे मुख्य लक्ष सॉफ्टवेअरवर आहे. (हेही वाचा: Tesla Hiring: एलोन मस्कची टेस्ला करणार AI आणि Robotics साठी 800 नवीन कर्मचाऱ्यांची भरती)
खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात जनरल मोटर्स टाळेबंदीचा मार्ग अवलंबत आहे. वाहन उद्योगात मंदी येण्याची शक्यता असताना कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी टेस्लाच्या संपूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टमशी स्पर्धा करण्यासाठी, कंपनीने अल्ट्रा-क्रूझ प्रोग्राम सुरू केला मात्र जानेवारीत तो बंद केला. दरम्यान, जनरल मोटर्सचे माजी प्रमुख माईक ॲबॉट यांनी मार्च 2024 मध्ये आरोग्याच्या कारणांमुळे कंपनीमधून राजीनामा दिला होता. यानंतर बॅरिस सेटिनोक आणि डेव्ह रिचर्डसन यांना जनरल मोटर्सचे प्रमुख बनवण्यात आले. ते व्हेईकल इन्फोटेनमेंट, ऑन स्टार सर्व्हिसेस आणि जनरल मोटर्सच्या सुपर क्रूझ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्ट सारख्या क्षेत्रांच्या देखरेखीचे नेतृत्व करतात.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
