आता इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग करण्याची चिंता सोडा कारण एका मिनिटात फुल होणार बॅटरी, जाणून घ्या कसे
(Photo Credit: Twitter)

भारतात सातत्याने इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या जात आहेत. या स्कूटर्स उत्तम रेंज आणि खिशाला परवडतील याच किंमतीसह मार्केटमध्ये उतरवल्या जात आहेत. नेहमीच्या वापरासाठी या स्कूटर कामी येतात. कारण लोकांना याच्या माध्यमातून 20 ते 25 किमी अंतर सहज पार करु शकतात. स्कूटरची रेंज ही तुम्ही कोणत्या स्पीडने ती चालवत आहात त्यावर अवलंबून आहे. दरम्यान काही लोक अधिक किमीचा सुद्धा प्रवास करतात. परंतु स्कूटरची रेंज अधिक नसल्यास तुम्ही अधिक दूरचा प्रवास अशा इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातून करु शकत नाहीत. कारण ती वेळोवेळी तुम्हाला चार्ज करावी लागेल. याच पार्श्वभुमीवर मार्केटमध्ये अशा काही स्कूटर्स येणार आहेत ज्यांना स्वॅपेबल बॅटरी दिली जाणार आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.

स्वॅपेबल बॅटरी ही इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी नवी कॉन्सेप्ट आहे. सध्या नव्या इलेक्ट्रॉनिक स्कूटर्स मध्ये स्वॅपेबल बॅटरी दिली जात आहे. ही बॅटरी तुम्ही स्वत:हून ही काढू शकता आणि त्यासाठी अधिक कष्ट घेण्याची सुद्धा गरज भासत नाही. यापूर्वीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ही सुविधा दिली जात नव्हती. त्यामुळे फक्त मॅकॅनिकच त्याची बॅटरी बदलू शकत होता.(अखेर Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार तयार करणारी कंपनी Tesla ची भारतामध्ये एन्ट्री; बेंगळुरू येथे थाटले कार्यालय, तीन संचालकांची नावे जाहीर) 

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी असण्याचा फायदा असा होतो की, चार्जिंग संपल्यानंतर तुम्ही ती लगेच बदलू शकता. त्यामुळे तुम्हाला वेळेचा विलंब ही न लावता तुमच्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहचता येणार आहे. जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 50 किमी आहे तर बॅटरी स्वॅप करुन 100 किमी पर्यंतचे अंतर सहज पार करु शकता.(भारतात लवकरच येणार नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल; सिंगल चार्जमध्ये 150km चे अंतर कापणार)

देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे. यामध्येच असे सुद्धा समोर आले की. देशभरातील पेट्रोल पंपावर बॅटरी स्वॅपिंग सर्विस दिली जाणार आहे. जेथे काही शुल्क भरुन इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जिंग करता येणार आहे. या सर्विसच्या माध्यमातून तुमची इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या 2 मिनिटांत पूर्णपणे चार्जिंग होणार आहे.