भारतातील रस्त्यांवर आपल्याला हजारोंच्या संख्येने वाहने दिसून येतात. त्यामध्ये बहुतांश लोकांचे लक्ष वाहनांवरील नंबर प्लेटकडे जात नाही. मात्र विविध रंगाच्या नबंर प्लेट मागे काही तरी कारण असून ते सर्वच जणांचा माहिती सुद्धा नसते. पण तुम्हाला कधी या नंबर प्लेटच्या रंगाबद्दल प्रश्न पडला असेलच ना? या कारणास्तव आम्ही तुम्हाला कारवरील नंबर प्लेटच्या रंगाबद्दल अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला त्याची नेमकी खासियत कायआणि त्याचा कशासाठी वापर केला जातो हे तुम्हाला कळू शकणार आहे.(वाहन चालकांना आता Driving Licence आणि RC सारखी महत्वाची कागपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही, स्मार्टफोनच्या माध्यमातून अशा पद्धतीने करा Access)
काळ्या रंगाची नंबर प्लेट ही कमर्शिअल वाहनांसाठी वापरली जाते. काळ्या नंबरच्या प्लेटवर पिळळ्या रंगाने क्रमांक लिहिलेले असतात. त्यामुळे अशा वाहनांचा बहुतांश करुन वापर हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या वाहनांसाठी केला जातो. सफेद रंगाची नंबर प्लेट ही सामान्य नागरिकांसाठी असते. या प्लेटचा क्रमांक खासगी वाहनांसाठी केला जातो. कमर्शिअल वाहनांसाठी या नंबर प्लेटचा वापर केला जात नाही. त्याचसोबत निळ्या रंगाची प्लेट्सचा वापर परदेशी प्रतिनिधींकडून केला जातो. ही नंबर प्लेट परदेशी दूतवास किंवा युएन मिशन संदर्भात जोडल्या गेलेल्या लोकांच्या कारसाठी वापर केला जातो. त्यावर निळ्या रंगाच्या प्लेटवर सफेद रंगाने क्रमांक लिहिलेले असतात.