Datsun च्या 'या' फॅमिली कारवर दिला जातोय 51 हजारांचा बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Datsun Go (Photo Credits-Twitter)

Datsun च्या कार भारतात पॉप्युलर असून दमदार फिचर्स आणि किंमतीसह उपलब्ध आहे. कंपनीच्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला असून त्यांनी आता डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे. खरंतर Datsun Go वर कंपनी पूर्णपणे 51,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ज्याचा फायदा ग्रहाकांना मिळणार आहे. फेस्टिव्ह सीजन नंतर ही कंपनी डिस्काउंट ऑफर करत आहे. तुम्ही लहान फॅमिलीसाठी कोणतीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.(Ola Electric Scooters: ओला लवकरच भारतात लॉन्च करणार इलेक्ट्रीक स्कूटर; आता कमी किंमतीत मिळणार शानदार मायलेज)

Datsun GO ची किंमत 3,99,000 रुपये आहे. कंपनी या कारवर 51 हजारांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये 11 हजारांचा Year End Bonous, 20 हजारांचा कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. Datsun GO ही भारतातील एक पॉवरफुल कार आहे. याची किंमत सहजपणे शिखाला परवडणारी आहे. Datsun GO मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले असून जी 77PS ची पॉवर आणि 10Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि CVT दोन्ही ट्रान्समिशनसह येणार आहे.(Nissan Magnite च्या भारतातील लॉन्चिंग बद्दल खुलासा, 5.50 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता- रिपोर्ट)

फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास या कारचे डिझाइन अत्यंत स्लीक आणि बोल्ड आहे. या मॉडेलमध्ये डायमंड कट R14 अलॉय व्हिल्स दिल्याने त्याला एक वेगळा लूक येतो. कारच्या फ्रंटला स्टायलिश LED DRLs दिले आहे. त्याचसोबत कंपनीने यामध्ये 180mm चा बेस्ट इन क्लास ग्राउंड क्लियरेंस ही दिला आहे. कारच्या इंटरियरमध्ये अॅन्टी फॅटींग सीट्स दिले आहेत.