BMW M5 Competition (Photo Credits-Twitter)

आलिशान गाड्यांमधील एक बीएमडब्लू यांनी त्यांच्या सीरिजमधील BMW M5 Competition ही नव्या मॉडेलची कार नुकतीच भारतात लॉन्च केली आहे. ही कार भारतात पूर्णपणे बिल्ट युनिटच्या (CBU) आधारावर लॉन्च करण्यात आली आहे. या कारची एक्सशो रुम किंमत 1.55 कोटी रुपये आहे. कारमध्ये स्टॅन्डर्ड BMW 5 मध्ये देण्यात आलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच 4.4 लीटर ट्वीन टर्बो V8 मोटार देण्यात आली आहे. दिलेली मोटार 616bhp पॉवर आणि 750Nm टॉर्क जनरेट करते.

कारमध्ये 8 स्पीड M स्टेपट्रॉनिक ट्रान्समिशन दिले असून 3.3 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. स्टॅन्डर्ड M5 100 किमी प्रति तासच्या वेगाने 3.9 सेकंदचा वेळ घेतो. तसेच M xDrive ऑल व्हिल ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे. M5 Competition मध्ये नवे फिचर्स देण्यात आले आहेत. रेडिएटर ग्रिल, विंग मिरर, रियर अप्रॉन, रियर स्पाॉइलर सुद्धा देण्यात आले आहेत.(स्पोर्टी लूक सह जबरदस्त फिचर्स असलेली Hyundai i10 N Line लवकरच होणार भारतात लाँच)

BMW M5 Competition चे मॉडेल BMW M5 च्या वेरियंटपेक्षा 10 लाख रुपयांनी जास्त असून त्याची किंमत 1.44 कोटी आहे. या कारला Mercedes-AMG E 63S आणि Audi RS7 Performance टक्कर देणाऱ्या ठरणार आहेत. तसेच नुकतीच बीएमडब्लूच्या तीन सिरिज लॉन्च करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुढील बाजूस L आकारात एलईडी डीआरएल, अलईडी हेडलॅम्प, एलईडी पॉग लॅम्प देण्यात आले आहेत.