दक्षिण कोरियन कंपनी Hyundai लवकरच आपली नवीनतम कार i10 N Line भारतीय बाजारात लाँच करण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या Frankfurt Motor Show 2019 मध्ये ही कारच मॉडेल दाखविण्यात आले. ही गाडी थर्ड-जेनरेशन i10 (यूरोपिअन मॉडेल)चं स्पोर्टी व्हर्जन आहे. नुकतीच भारतात लाँच झालेल्या Hyundai Grand i10 Nios चे Hyundai i10 N Line याचे अॅडव्हान्स व्हर्जन असेल. या गाडीचे स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल इंजिन या कारचे मुख्य आकर्षण असणार आहे.
Hyundai i10 N Line ठळक वैशिष्ट्ये:
या कारमध्ये इंजिनसाठी 2 पर्याय दिले आहेत. यात एक 1.2-लीटर, 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 bhp पावर आणि 112 Nm पीक टॉर्क जेनरेट करतं. हे इंजिन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणाऱ्या i10 आणि भारतातील Grand i10 Nios मध्ये देण्यात आलं आहे. त्याशिवाय 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे 99hp पावर आणि 172Nm टॉर्क जनरेट करतं. टर्बोचार्ज्ड इंजिन असलेलं मॉडेल i10 चं आतापर्यंतच सर्वात पावरफुल व्हेरिएंट असेल.
हेही वाचा- Hyundai Grand i10 Nios झाली लॉन्च; पहा या दमदार गाडीची फीचर्स, किंमत काय?
Hyundai i10 N Line मध्ये नवीन बंपर, नवीन डिजाईनचं ग्रील, 16-इंचाचे अलॉय व्हील्ज आणि अँग्युलर एलईडी डेटाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. यामुळे ही Hyundai i10 N Line इतर गाड्यांपेक्षा वेगळी आहे. शिवाय, स्पोर्टी लूक असलेल्या या गाडीत रिअर स्कीड प्लेट आणि डिफ्यूजरही आहे. या गाडीत स्टिअरिंग व्हिल आणि गिअर-शिफ्ट लीव्हरवर ‘N’ ब्रँडिंग, मेटल पेडल्स आणि अपग्रेडेड सीट्स देण्यात आल्या आहेत. हेदेखील वाचा- खुशखबर! Maruti Suzuki पासून Hyundai पर्यंतच्या गाड्यांवर मिळत आहेत 4 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
स्पोर्टी आणि आकर्षक फिचर्स असलेल्या या गाडीला पुढील वर्षी युरोपीय बाजारात लाँच केले जाईल. त्यानंतर कंपनी लवकरच हे गाडी भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे.