Hyundai Grand i10 Nios झाली लॉन्च; पहा या दमदार गाडीची फीचर्स, किंमत काय?
Hyundai Grand i10 Nios (Photo Credits: Hyundai)

दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ने आज Hyundai Grand i10 Nios ही हॅचबॅक प्रकारातील नवी कार लॉन्च केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्टायलिश अंदाज आणि स्पेशियस कॅबिन याच्यामुळे हुंडाईच्या नव्या कार बाबत ग्रहाकांच्या मनात उत्सुकता होती. आता ही कार लॉन्च करण्यात आली आहे. i10 सीरीजमधील ही तिसरी कार आहे. NIOS चा अर्थ जास्त, त्यामुळे हुंडाईची ही नवी Hyundai Grand i10 Nios गाडी ग्राहकांना इंजिनियरिंग आणि उत्तम क्वालिटी देईल असे फीचर्स त्यामध्ये समाविष्ट केले आहेत असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Hyundai Grand i10 Nios ची फीचर्स

Hyundai Grand i10 Nios या कारमध्ये 20.25 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 13.46 सेमी डिजिटल स्पीडोमीटर आणि क्लसटर सोबत मल्टी इंफोर्मेशन डिस्प्ले, Arkamys प्रीमियम साउंड सिस्टम, फुल ऑटोमेटिक एयर कंडीशनर, रियर एसी वेंट्स, इको कोटिंग टेक्नोलॉजी, हाय इफेक्टिव एयरफ्लो, वायरलेस फोन चार्जर, वॉशर सोबत रियर वाइपर, रियर डिफोगर, रियर सीट एडजस्टेबल हेडरेस्ट, USB चार्जर, रियर पावर आउटलेट, हेडलॅप एस्कॉर्ट फंक्शन सारखी फंक्शन्स आहेत.

इंजिन क्षमता

इंजिन आणि पावर मध्ये पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर चे 1197 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 11.6 केजीएम जनरेट करते. मायलेजच्या दृष्टीने करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पेट्रोल व्हेरिएंट एमटी 20.7 किमी प्रति लीटर मायलेज देते तर एएमटी 20.5 किमी मायलेज देऊ शकते. इंजिन आणि पॉवरच्या दृष्टीने डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर चे1186 सीसी का इंजिन आहे. ते 75 पीएस पॉवर आणि 19.4 केजीएम जनरेट करू शकते. याच्या मायलेजच्या दाव्यानुसार, डीजल व्हेरिएंट एमटी 26.2 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. एएमटी 26.2 किमीचं मायलेज मिळू शकतं.

किंमत काय?

पेट्रोल व्हर्जन मधील कार 499,990 ते 668,350 या रेंजमध्ये उपलब्ध आहे. तर डिझेल व्हर्जनमध्ये 670,090 ते 785,350 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

 

हुंडाईकडून कारची बुकिंग यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. 11,000 च्या टोकनवर कार बुक करणं शक्य होतं. लॉन्चिंग पूर्वीच या कार्स पोहचल्या आहेत.