देशात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा फटका ऑटो इंडस्ट्रीला जबरदस्त बसला आहे. त्यामुळे सातत्याने वाहन खरेदी करण्याच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. तर सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 23 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमधील मंदी कायम राहिली असून ही एक गंभीर परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये देशातील उत्पादन जीडीपीमध्ये 49 टक्के योगदान आहे. यातच आता विक्रीत घट झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे.
घरगुती बाजारात वाहनांची विक्री सप्टेंबर महिन्यात 23.69 टक्क्यांनी कमी होऊन 2,23,317 युनिट्सवर पोहचली आहे. गेल्या वर्षात याच महिन्यात 2,29,660 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. सियाम (SIAM) यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. सातत्याने वाहन विक्रीत घट झाल्याचा हा 11 वा महिना आहे.एसआयएमच्या आकड्यांनुसार अहवाल देण्याच्या महिन्यादरम्यान वाहनांची घरगुती विक्रीत सप्टेंबर 2018 मध्ये 1,97,124 युनिट्स तुलनेत 33.40 टक्के घट झाली. तसेच मोटारसायकलची विक्री गेल्या वर्षात 13,60,415 युनिट्सच्या तुलनेत 23.29 टक्के कमी होऊन 10,43,624 युनिट्स झाली आहे.(आर्थिक मंदीचा मारुती सुझुकी कंपनीला मोठा फटका, सलग आठव्या महिन्यातही उत्पादन कपात)
एवढेच नाही सप्टेंबर महिन्यादरम्यान दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.09 टक्के कमी होऊन 16,56,774 युनिट्स झाली. गेल्या वर्षात याच महिन्यात 21,26, 445 दुचाकींची विक्री झाली होती.सियाम यांनी असे म्हटले आहे की, व्यावसायिक वाहनांची विक्री 39.06 टक्के कमी होऊन 58,419 युनिट्सवर आली. तर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे जगातील आर्थिक मंदीचा धोका वेगाने वाढत आहे, ज्याचा परिणामही भारतावर झाला आहे.