आर्थिक मंदीचा मारुती सुझुकी कंपनीला मोठा फटका, सलग आठव्या महिन्यातही उत्पादन कपात
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

अर्थिक मंदीचा (Financial Crisis) सर्वात मोठ फटक वाहन उत्पादन (Vehicle Production) क्षेत्रावर बसला असून या क्षेत्रातील मरगळ कायम आहे. वाहन उत्पादन कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सलग आठव्या महिन्यातही उत्पादन कपात केली आहे. सध्या बाजारात वाहनांची मागणी कमी होत आहे. यामुळे मारुती सुझुकी कंपनीला त्यांच्या उत्पदनात कपात करावी लागली आहे. वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यानाही अर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे.

मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात 17.48 टक्क्यांनी त्यांच्या उत्पादनात कपात केली आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या उत्पादनात 17.37 टक्क्यांची घट केली आहे. सध्या बाजारात वाहनांना मागणी नसल्यामुळे मारुती सुझुकीने त्यांच्या उत्पादनात घट केली आहे. यात मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मोडणाऱ्या Alto, New Wagon R, Celerio, Ignis, Swift, Baleno आणि Desire उत्पादनात मारुतीने 14.91 टक्क्यांनी कपात केली आहे. तर Vitara Brezza, Ertiga, S-Cross या युटिलिटी व्हिईकल्सचे उत्पादन 17.05 टक्क्यानी कमी करण्यात आले आहे. तसेच सेदान सेग्मेंटमध्ये असणाऱ्या सियाझ कारचे उत्पादनही मारुतीने मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे उत्पादन सध्याच्या उत्पदनापेक्षा अधिक होते. हे देखील वाचा-भारतातील 'या' दिग्गज कार निर्माता कंपनीला लागले ग्रहण; गेल्या 9 महिन्यात फक्त 1 कार विकली गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचे पहिले कारण म्हणजे त्याचा परिणाम महागाईवर झाला आहे. दुसरे कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन मूल्य. आयातीवरील निर्यातीत घट झाल्याने देशाची वित्तीय तूट वाढली आणि परकीय चलन साठा कमी झाला. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे जगातील आर्थिक मंदीचा धोका वेगाने वाढत आहे, ज्याचा परिणामही भारतावर झाला आहे.