World's Most Beautiful Mummy: 'ही' आहे जगातील सर्वात सुंदर ममी; 100  वर्षांपूर्वी मरण पावलेल्या 2 वर्षांच्या मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
World's Most Beautiful Mummy (संग्रहित संपादित प्रतिमा)

तुम्ही ‘ममी’बद्दल (Mummy) नक्कीच ऐकले असेल. इजिप्तसह जगभरात अनेक ठिकाणी आजही असे ममी म्हणजेच जतन केलेले मृतदेह आढळलात. कधी कधी त्यांचे फोटो सुद्धा अंगावर काटा आणणारे असतात. पण तुम्ही कधी सुंदर ममीबद्दल ऐकले आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर ममीबद्दल सांगणार आहोत. इटलीतील एका लहान मुलीच्या ममीला जगातील जगातील सर्वात सुंदर ममी (World's Most Beautiful Mummy) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मुलीला पाहिल्यावर तुम्हाला समजणार देखील नाही की, ते एका मुलीचे मृत शरीर आहे. तुम्हाला वाटेल की, जणूकाही लहान मुलगी झोपली आहे. ही ममी रोसालिया लोम्बार्डोची (Rosalia Lombardo) आहे.

100 वर्षांपूर्वी, 2 वर्षांच्या रोसालिया या मुलीचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह जतन करण्यात आला आहे. आता तिला 'जगातील सर्वात सुंदर ममी' म्हणून ओळखले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर 1920 रोजी रोसालिया लोम्बार्डोचा मृत्यू तिच्या दुसऱ्या वाढदिवसापूर्वी झाला होता. न्यूमोनियामुळे तिचा मृत्यू झाला होता. यानंतर तिचा मृतदेह उत्तर सिसिलीमधील (Northern Sicily) पालेर्मोच्या (Palermo) कॅपुचिन कॅटाकॉम्ब्समध्ये (Capuchin Catacombs) संरक्षित आणि प्रदर्शित करण्यात आला. पर्यावरणीय घटकांमुळे शरीराचा ऱ्हास टाळण्यासाठी रोसालियाचे शरीर नायट्रोजनने भरलेल्या काचेच्या पेटीत ठेवले गेले आहे.

आता कॅपुचिन कॅटाकॉम्ब्स पर्यटकांसाठी एक आकर्षण बनले आहेत, कारण रोसालियाचे शरीर शतकानंतरही उल्लेखनीयपणे संरक्षित आहे. कॅपचिन कॅटाकॉम्ब्समध्ये आणखी 8,000 ममी आहेत, परंतु रोसालियाइतकी योग्य आणि चांगल्या प्रकारे कोणतीही ममी जतन केलेली नाही. याबाबत जास्त कोणाला माहीत नसल्यामुळे, तिचे राखाडी केस आणि त्वचा अजूनही संरक्षक काचेच्या शवपेटीमध्ये पूर्णपणे शाबूत आहे. (हेही वाचा: Muslim Brotherhood: मुस्लिम ब्रदरहुड संघटना विचार, कार्य आणि दहशतवाद)

परंतु याबाबत लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. स्कॅन आणि क्ष-किरणांनी याची पुष्टी केली की रोसालियाच्या कंकालची रचना आणि अवयव 100 वर्षांनंतर शाबूत आहेत. फक्त तिचा मेंदू त्याच्या मूळ आकाराच्या 50 टक्के संकुचित झाला आहे. परंतु, Dario Piombino-Mascali, एक जैव पुरातत्वशास्त्रज्ञ आणि कॅपुचिन कॅटाकॉम्ब्सचे वैज्ञानिक क्युरेटर यांनी 2014 मध्ये एका निवेदनात म्हटले होते, 'हा प्रकाशामुळे निर्माण झालेला एक ऑप्टिकल भ्रम आहे जो बाजूच्या खिडक्यांमधून फिल्टर होतो, जो दिवसा बदलू शकतो. उत्तम प्रकारे जतन केलेल्या शरीराभोवती असलेल्या गूढतेमुळे, रोसालिया इटलीमध्ये संशोधनाचा विषय बनली आहे.