Vistara Airlines : जेव्हा आधी विमानाने प्रवास व्हायचा तेव्हा मोबाईल फ्लाइट मोडमध्ये टाकावा लागत होता. मात्र त्यानंतर विमान कंपन्यांनी विमानात इंटरनेट सेवा सुरू केली. त्यानंतर आता एका विमान कंपनीने आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर 20 मिनिटे मोफत वाय-फाय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने (vistara airlines) विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा (Free WiFI in Flights) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह विस्तारा एअरलाइन्स आंतरराष्ट्रीय प्रवासात विमानात इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. (हेही वाचा:Airlines ला 12 वर्षांखालील प्रवास करणार्या मुलांना त्यांच्यासोबत प्रवास करणार्या एका पालकासोबत विना अतिरिक्त शुल्क सीट द्यावीच लागणार; DGCA चे निर्देश )
टाटा-सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उपक्रम एअरलाइनने सांगितले की, मोफत, 20-मिनिटांचा वाय-फाय सर्व केबिनमधील प्रवाशांना कनेक्ट राहिल त्यासाठी त्यांनी भारतीय क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून त्याबाबतचा प्लान खरंदी करावा लागेल. सध्या बोईंग 787-9 ड्रीमलाइनर आणि एअरबस A321 निओ विमानांवर ही सेवा उपलब्ध आहे. ही सेवा ग्राहकांना ईमेलद्वारे वन-टाइम पासवर्डद्वारे मिळणार आहे. (हेही वाचा: Singapore Airlines: सिंगापूर एअरलाइन्सकडून कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस; बोनस म्हणून थेट 8 महिन्यांचा पगारच दिला)
विस्ताराचे मुख्य व्यावसायिक अधिकारी दीपक राजावत यांनी त्यावर त्यांचे मत नमूद केले. “आम्हाला खात्री आहे की ग्राहक विमान कंपन्यांच्या मूल्यवर्धनाची प्रशंसा करतील, ज्यामुळे त्यांचा विस्तारा प्रवास अधिक सोयीस्कर, उत्पादनक्षम होईल.” याव्यतिरिक्त, बिझनेस क्लास आणि प्लॅटिनम क्लब प्रवाशांसाठी विस्ताराने 50 MB मोफत वाय-फाय प्रदान केला आहे.एअरलाइननुसार, सदस्य नसलेल्यांना WhatsApp सारख्या मेसेजिंग ॲप्सवर अमर्यादित डेटा ऍक्सेससाठी 372.74 रुपये अधिक GST आकारले जाईल. या फ्लाइट्सवर इंटरनेट सर्फिंगसाठी, एअरलाइनने सेवेची किंमत रु. 1,577.54 आणि GST असा आहे. ज्यामध्ये सोशल मीडिया आणि वेबवर ऑडिओ आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगचा समावेश आहे.
सर्व स्ट्रीमिंग प्रोटोकॉलला अनुमती देणारा अमर्यादित डेटा रु. 2707.04 अधिक GST मध्ये उपलब्ध आहे, असे विस्ताराकडून सांगण्यात आले आहे. एअरलाइनने म्हटले आहे की त्यांच्या इन-फ्लाइट मनोरंजन प्रणालीत चित्रपट, टीव्ही शो आणि ऑडिओ शीर्षकांसह सुमारे 700 तास सामग्री देतात.