Myanmar: म्यानमारमध्ये लष्करशाही विरोधात जनभावना तीव्र, मोठ्या प्रमाणावर निदर्शने
Aung San Suu Kyi | (Photo Credits-Facebook)

म्यानमार (Myanmar) देशातील स्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या सरकारला अवैध ठरवत तिथे लष्कराने सत्ता हाती घेतली आहे. त्यामुळे चिडलेले नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यात आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. लोकशाही मर्गाने निवडणुका झाल्यावर म्यानमारच्या जनतेने आंग सान सू की (Aang Sang Su Ki) यांच्या पक्षाच्या बाजूने आपला कौल दिला होता. मात्र, लष्करानेआंग सान सू की यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांना नजरकैदेत ठवले आणि सत्तापालट केला.

दरम्यान, लष्काराने केलेल्या सत्तांतरानंतर देशातील विविध शहरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उठाव केला. अनेक नागरिकांनी निदर्शने, मोर्चे आणि आंदोलने सुरु केली. हजारो नागरिक म्यानमारमधील यांगून येथील अमेरिकी दूतावासाजवळ एकत्र जमले आहेत. (हेही वाचा, Myanmar Coup: म्यानमार सत्ताबदल, भारताने व्यक्त केली चिंता, अमेरिकेनेही दिला इशारा)

दुसऱ्या बाजूला म्यानमार लष्कराने जवान आणि त्यांच्यासोबत आणि 20 ट्रक तैनात केले आहेत. लष्कराच्या कृतीविरोधा ‘सिविल डिसोबीडीअन्स मूवमेंट’ने नागरिकांना उपोषण करण्याचे अवाहन केले आहे. तर सरकार प्रसारमाध्यम ‘एमआरटीवी’ वर नागरिकांच्या उपोषणाविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली.

‘स्टेट एडमिनिस्ट्रेशन काउंसिल’ ने म्हटले आहे की, असे आढळून आले आहे की, आंदोलकांना 22 फेब्रुवारी या दिवशी दंगा करण्यासाठी भडकावण्यात आले आहे. प्रामुख्याने युवकांना मोठ्या प्रमाणावर भडकविण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.