भारताचा शेजारी देश म्यानमारमधये लष्काराने सत्तांतर (Myanmar Military Coup) केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की (Aung San Suu Kyi Detained) यांना त्यांच्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे. आंग सान सू की या म्यानमारच्या स्टेट काऊन्सीलर आहेत. त्यांच्यासोबत देशातील इतरही काही सत्ताधारी नेत्यांना नजरकैद केल्याचे वृत्त आहे. म्यानमारमधील या घटनेनंतर भारताने ( India On Myanmar Coup) चिंता व्यक्त केली आहे. तर महासत्ता अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला (US On Myanmar Coup) इशारा दिला आहे.
अमेरिकेने म्यानमारमधील हे सत्तांतर अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला थेट इशारा देत म्हटले आहे की, याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. लोकशाही मार्गाने निवडूण आलेल्या सरकारविरुद्ध अशा प्रकारे सत्तांतर करणे गंभीर आहे. या प्रकारबद्दल कारवाई केली जाईल, असेही अमेरिकेने म्हटले आहे. (हेही वाचा, Aung San Suu Kyi: भारताचा शेजारी म्यानमारमध्ये सत्तांतराची चिन्हे; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्रपती लष्कराच्या ताब्यात, आणिबाणीचेही वृत्त)
व्हाईट हाऊसचे प्रवकेत जेन पास्की यांनी म्हटले आहे की, अमेरिका म्यानमारमधील घटनांवर लक्ष ठेऊन आहे. आम्ही म्यानमारमधील लोकशाही आणि लोकशाही मानणाऱ्या घटकांना पाठिंबा देत आहोत. आम्ही म्यानमारमधील लष्कराला अग्रह करतो की त्यांनी लोकशाही स्वीकारावी आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले कायद्याचे राज्य टीकू द्यावे. दरम्यान, या सर्व घटना घडामोडींची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बाइनड (President Joe Biden) यांनाही देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतानेही म्यानमारमध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आम्ही म्यानमारमधील लोकशाहीचे नेहमीच समर्थन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमध्ये घडत असलेल्या घटना घडामोडींवर बारीक नजर ठेवली आहे. महत्त्वाचे असे की म्यानमारमध्ये लोकशाही राज्य यावे यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशिल राहिला आहे.