भारतीय बँकांचे कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya) ह्याला मुंबईच्या कोर्टाने 'फरार आर्थिक गुन्हेगार'(Fugitive Economic Offender) म्हणून 5 जानेवारी रोजी घोषित केले. स्पेशल प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऐक्ट कोर्ट (Special PMLA Court) यांनी हा निकाल दिला आहे. त्यामुळे ईडीकडून लवकरच त्याच्या मालमत्तेवर कारवाई आणि जप्ती आणण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहे. मात्र आपल्याला ताब्यात घेऊन नये आणि बँक घोटाळ्यातील माहिती सीबीआय (CBI) ला मिळू नयेत म्हणून विजय मल्ल्याने धडपड करण्यास सुरुवात केली आहे.
फरारी मद्यसम्राट मल्ल्याने न्यायालयासमोर केलेली धडपड आता 'गोथम डायजेस्ट' यांच्या संकेतस्थलावर पोहचली आहे. त्यामुळे स्वीस लवादाने जाहीर केलेल्या निकालामुळे मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग खुला झाला आहे. गोथम संकेतस्थळामुळे स्वीस प्रांतिक न्यायालयांना परस्पर कायदेविषयक सहायता करारांबद्दल आलेल्या याचिकांवर लक्ष ठेवता येते.(हेही वाचा-कर्जाची 100% परतफेड करण्यास तयार, कृपया स्वीकार करा: विजय मल्ल्या)
जिनिव्हा येथील न्यायालयाने मल्ल्याच्या बँक खात्याचा तपशील सीबीआयला देऊ करावे असा आदेश दिला होता. परंतु स्वीस लवादात धाव घेत मल्ल्याने बँक तपशील भारताला देऊ नये अशी मागणी केली होती.