sex slave guru | (Photo credit: archived, edited, representative image)

अमेरिकेमध्ये नुकताच एका Female Sex Slaves Secret Racket चा भांडाफोड झाला. हे रॅकेट चालवण्या अमेरिकेतील एक प्रसिद्ध गुरुखीत रॅनेरे (Keith Raniere) याचा हात असल्याचे पुढे आले आहे. एका सेक्स रॅकेट प्रकरणात गुरुचा हात असावा या वृत्ताने अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये भलतीच खळबळ उडवून दिली आहे. Keith Raniere हा एका सेल्फ हेल्प सोसायटीचा प्रमुख आहे. कीथ रॅनेरे याच्यावर आरोप आहे की, तो आपल्या सेल्फ हेल्प सोसायटीच्या माध्यमातून Sex Slaves Secret Racket चालवत होता. कीथ रॅनेरे याच्यावरील आरोपांवरील खटल्याची न्यायालयात मंगळवारपासून सुनावणी सुरु झाली.

ज्या Female Sex Slaves Secret Racket मध्ये कीथ रॅनेरे याला आरोपी करण्यात आले आहे त्यात आणखी 6 लोकांचाही समावेश आहे. कीथ हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. विशेष असे की, कीथ याच्यासोबत आरोपी असलेले इतर पाच लोग या महिला आरोपी आहेत. या महिला (आरोपी) सेल्फ हेल्प सोसायटीचे व्यवस्थापन पाहात असत. दरम्यान, या पाचही महिलांनी आपल्यावरील आरोप कबूल केल्याने त्यांच्यावर सुनावणी घेतली जाणार नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, कीथ रॅनेरे हा Nxivm नावाच्या संस्थेत प्रमुख आहे. कीथ रॅनेरे याच्याविरुद्ध याचिकाकर्त्या पक्षाने केलेल्या आरोपानुसार, कीथ याची ही संस्था आपल्या समर्थकांकडून पैसे उकळत होती. त्यानंतर त्यांच्या जाळ्यात येणाऱ्या महिलांचे शोषण करत होती. एनडीटीव्हीने याबाबत वृत्तदिले आहे. या वृत्तानुसार, गेल्या दोन दशकांत सुमारे 16,000 हजार लोक या संस्थेने घेतलेल्या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या संस्थेच्या केवळ 5 दिवसांच्या कार्यशाळेचे शुल्क तब्बल 5000 डॉलर इतके होते. धक्कादायक असे की, या संस्थेच्या कार्यशाळेत सहभागी झालेले अनेक समर्थक असे आहेत की, या समर्थकांना संस्थेच्या कार्यशाळेचे शुल्क भरता आले नाही. त्यामळे त्यांनी संस्थेसाठी अल्प मानधनात किंवा मोफत काम करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये कीथ रॅनेरे याने एक गुप्त सोसायटी बनवली. त्या संस्थेचे नाव DOS असे ठेवण्यात आले. या संस्थेचे वैशिष्ट्य असे की, या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी केवळ कीथ रॅनेरे याचा अपवाद वगळता इतर सर्व सदस्य महिलाच आहेत. (हेही वाचा, भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)

कीथ हा सोसायटीच्या सदस्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच, लैंगिक शोषण करण्यापूर्वी संबंधित महिलांना त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे, पत्रं, आदी गोष्टी मागितल्या जात होत्या. पुढे जर एखादी महिला DOS सोडू इच्छित असेल तर, तिला मज्जाव करण्यात येत असे. तिची आक्षेपार्ह चित्र, पत्र, व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात असे. काही महिला सदस्यांनी एकत्रितपणे आवज उठवल्यानंतर आणि न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

हे प्रकरण बाहेर येण्यापूर्वीच आरोपी कीथ रेगेन हा 2017 पासून फरार झाला होता. गेल्या मार्च (2019) महिन्या त्याला मॅक्सिको येथील लग्जरी व्हिला येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. कीथ रॅनेरे याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंग आणि कट रचने असे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कीथवर सध्या केवळ आरोपच आहेत. पण, त्याच्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर, त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सध्यास्थितीत रॅनेरे याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्यावरील आरोपाबाबत सुनावनी केवळ 6 आठवड्यात समाप्त होणार आहे. त्यामुळे त्याच्या भविष्याचा फैसला लवकरच होणार आहे.