संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून जगभरात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 39 लाखांच्या वर जाऊन पोहोचली आहे. जगभरात सर्वाधिक मृत्यूचे तांडव सुरु असलेल्या अमेरिका देशात गेल्या 24 तासांत 2,448 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. ही माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून जगभरात ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
जगभरात सद्य स्थितीत अडीच लाखाहून अधिक कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सद्य स्थितीत 12,92,623 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 75,543 वर पोहोचली आहे. Coronavirus in India: भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 56,342 वर, पाहा राज्यनिहाय आकडेवारी
US records 2,448 #coronavirus deaths in the past 24 hours, bringing the total toll to 75,543 according to Johns Hopkins University: AFP news agency
— ANI (@ANI) May 8, 2020
लॉकडाऊनमुळे परदेशात अनेक ठिकाणी भारतीय अडकून पडले आहेत. दरम्यान या सर्व नागरिकांना परत आणण्याची भारत सरकारने प्रकीया सुरु केली आहे. या प्रक्रीयेत एअर इंडियाच्या कमर्शियल फ्लाईट्स 9-15 मे दरम्यान अमेरिकेतून भारताच्या विविध शहरांत उड्डाण करतील. या फ्लाईट्समध्ये बैठक व्यवस्था मर्यादीत स्वरुपात उपलब्ध असल्याने मेडिकल इर्मजन्सी असलेल्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थी, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्ती प्राधान्यक्रमावर असतील. या प्रवासाच्या तिकीट दर नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे.
तर भारतात एकूण 56,342 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 1886 वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 3390 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून 103 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.