प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) हा विषाणूने अक्षरश: थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सद्य स्थितीत भारतात एकूण 56,342 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून मृतांची एकूण संख्या 1886 वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 17 मे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. ही परिस्थितीत आटोक्यात आली नाही तर हा लॉकडाऊन देखील आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 3390 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले असून 103 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

सद्य स्थितीत भारतात 37,916 कोरोना संक्रमित रुग्णावर उपचार सुरु असून 16,540 रुग्ण बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील रुग्णांची एकूण संख्या 17,974 इतकी आहे. त्यापाठोपाठ गुजरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. दिल्लीत नागरिकांना E-Token System च्या माध्यमातून दारु खरेदी करता येणार, सरकारचा निर्णय

पाहा राज्यनिहाय COVID-19 रुग्णांची आकडेवारी:

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 111 foreign Nationals) Cured/Discharged/

Migrated

Deaths ( more than 70% cases due to comorbidities )
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 1847 780 38
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 54 34 1
5 Bihar 550 246 5
6 Chandigarh 135 21 1
7 Chhattisgarh 59 38 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 5980 1931 66
10 Goa 7 7 0
11 Gujarat 7012 1709 425
12 Haryana 625 260 7
13 Himachal Pradesh 46 38 2
14 Jammu and Kashmir 793 335 9
15 Jharkhand 132 41 3
16 Karnataka 705 366 30
17 Kerala 503 474 4
18 Ladakh 42 17 0
19 Madhya Pradesh 3252 1231 193
20 Maharashtra 17974 3301 694
21 Manipur 2 2 0
22 Meghalaya 12 10 1
23 Mizoram 1 0 0
24 Odisha 219 62 2
25 Puducherry 9 6 0
26 Punjab 1644 149 28
27 Rajasthan 3427 1596 97
28 Tamil Nadu 5409 1547 37
29 Telengana 1123 650 29
30 Tripura 65 2 0
31 Uttarakhand 61 39 1
32 Uttar Pradesh 3071 1250 62
33 West Bengal 1548 364 151
Total number of confirmed cases in India 56342* 16540 1886
*States wise distribution is subject to further verification and reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR

देशातील कोरोनाची स्थिती पाहता तेलंगाना राज्यात लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आले आहे. त्यामुळे विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. याच दरम्यान सरकारने दारुची दुकाने सरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दारुच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. आता दिल्लीत सरकारने ई-टोकन सिस्टिमच्या सहाय्याने नागरिकांना दारु खरेदी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.