Man Kills Wife for Medical Bills: वैद्यकीय खर्च भरण्यात अपयश, पतीने रुग्णालयातच घोटला पत्नीचा गळा
Hospital Bed | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Medical Expenses: यूएसमधील मिसूरी येथील इंडिपेंडन्स सेंटरपॉईंट मेडिकल सेंटरमध्ये (Medical Center in Independence, Missouri) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीवर त्याच्या पत्नीची हत्या (Man Kills Wife ) केल्याचा आरोप आहे. सांगीतले जात आहे की, पत्नीचा वैद्यकीय खर्च भरण्यात अपयश आल्याने आरोपीने पीडितेचा रुग्णालयातच गळा आवळला आणि तिची हत्या केली. आरोपी रॉनी विग्स याने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे. दिलेल्या जबाबात त्याने म्हटले आहे की, पत्नीचे वैद्यकीय बिल (Medical Bills) परवडत नसल्यामुळे आपण हे कृत्य केले. (Husband wife Dispute)

पीडितेवर विविध आजारांसाठी उपचार

जॅक्सन काउंटीचे वकील जीन पीटर्स बेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही घटना घडली. ज्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी सर्वांनाच धक्का बसला. आयसीयूमध्ये एका रुग्णावर कथित हल्ल्याची घटना घडल्यानंतर ऑफ-ड्युटी पोलीस अधिकाऱ्याला सतर्क करण्यात आले होते. सध्यास्थितीत पीडितेची ओळख केवळ एक महिला म्हणून सांगितली जात आहे. पीडितेचे डायलिसिस आणि इतरही अवयवांवर उपचार सुरु होते. दरम्यान, ही घटना घडली. (हेही वाचा, Cardiovascular Disease in Women: 44% स्थूल महिलांमध्ये हृद्यरोगाशी निगडीत आजार - PGIMER study)

गळा दाबून प्राणघातक हल्ला

पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पीडित महिला (आरोपीची पत्नी) हॉस्पिटलच्या बेडवर झोपली असताना रॉनी विग्सने तिचा गळा दाबूला आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तिने आरडाओरडा करु नये तसेच तिला मदत मागण्यास किंवा प्रतिकार करण्याची संधीच मिळू नये यासाठी आरोपीने तिचे तोंड आणि नाक झाकले आणि दाबून धरले होते. फॉक्सने मिळवलेल्या न्यायालयीन नोंदीनुसार, पोलिस आल्यावर पीडितेची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. तिला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. परिणामी पोलिसांच्या उपस्थितीत तिची लाइफ सपोर्ट प्रणाली हटविण्यातत आली. तिच्या मेंदूनेही काम करणे थांबवले होते. (हेही वाचा, Indian Student Death in Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या; हरियाणामध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी केली सरकारकडे मदतीची मागणी)

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

रॉनी विग्स यानेच पत्नीचीह हत्या केल्याचे हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगीतले. तर, पोलिसांकडे दिलेल्या जबाबामध्ये विग्ज याने आपल्या कृत्याची कबुली दिली आणि तो म्हणाला की, 'होय, मी हे कृत्य केले. मी तिला मारले. मी तिचा गळा दाबला कारण मला तिचे वैद्यकीय बिल भरणे परवडत नव्हते.

इंडिपेंडन्स पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीदरम्यान, त्याने आपल्या पत्नीच्या वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान जाणूनबुजून तिच्या श्वासनलिकेमध्ये अडथळा आणल्याची कबुली दिली. हे कृत्य करण्यामागे आर्थिक संघर्ष आणि नैराश्य हे घटक कारणीभूत असल्याचेही आरोपीने सांगितले.