डोनाल्ड ट्रंम्प आणि जो बिडेन (Photo Credits-ANI)

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या US Presidential Election Results 2020) निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प Donald Trump) आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु असून आतापर्यंत आलेल्या मतमोजणीच्या आधारे जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन (Joe Biden)  सध्या आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मतमोजणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये असं म्हटलं आहे. यासंदर्भातील त्यांनी एक ट्विट सोशल मिडियावर केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प ट्विटमध्ये काय म्हणाले?

'जो बायडेन यांनी चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये, मीदेखील तसा दावा करु शकतो' असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोटाळा झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतची कायदेशीर कारवाई देखील सुरु झाली आहे असेही ते म्हणाले आहेत. हेदेखील वाचा- US Presidential Election 2020 Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीची मतमोजणी सुरू; Donald Trump की Joe Biden कोण मारणार बाजी?

येत्या काही तासांतच व्हाईट हाऊसचा सत्ताधीश कोण? याचा निकाल हाती येणार आहे. त्याच्या अनुषंगाने आज अमेरिकेमध्ये कडक बंदोबस्त आहे. दरम्यान अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये 538 पैकी किमान 270 इलेक्टोरेल मतं मिळवणं गरजेचे आहे. तेव्हाच व्हाईट हाऊसची सत्ता काबीज करणं शक्य असते. सध्या डोनाल्ड ट्र्म्प यांनी फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलीना तर जो बायडन यांनी न्यू यॉर्क, न्यू जर्सी जिंकलं आहे.