US Presidential Election 2020 Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीची मतमोजणी सुरू; Donald Trump की Joe Biden कोण मारणार बाजी?
US Presidential Election 2020 Results। File Image

अमेरिकेमध्ये यंदा कोरोना संकटामध्येच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. दरम्यान यंदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प (Donald Trump) यांच्या विरोधात जो बायडन ( Joe Biden) यांचं आव्हान आहे. कोरोना संकट, कृष्णवर्णीयांचा वाद आणि स्थानिकांना नोकरी मिळवून देण्यासाठी परदेशी नोकरदारांना रोखण्यासाठी कडक व्हिसा नियमावली असे अनेक विषय यंदाच्या निवडणूकीमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. 50 पैकी 22 अमेरिकेच्या राज्यांमधील निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. त्यापैकी 12 ठिकाणी ट्रम्प तर 10 ठिकाणी जो बायडन यांच्या पारड्यात पडलं आहे. जो बायडन ट्रम्प यांना कडवं आव्हान देण्यात आले आहे. US Presidential Election 2020: कोण होतील अमेरिकेचे नवे राष्ट्रपती? Siberian Bear आणि Tiger ने वर्तवली भविष्यवाणी, घ्या जाणून.

येत्या काही तासांतच व्हाईट हाऊसचा सत्ताधीश कोण? याचा निकाल हाती येणार आहे. त्याच्या अनुषंगाने आज अमेरिकेमध्ये कडक बंदोबस्त आहे. दरम्यान अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये 538 पैकी किमान 270 इलेक्टोरेल मतं मिळवणं गरजेचे आहे. तेव्हाच व्हाईट हाऊसची सत्ता काबीज करणं शक्य असते. सध्या डोनाल्ड ट्र्म्प यांनी फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलीना तर जो बायडन यांनी न्यू यॉर्क, न्यू जर्सी जिंकलं आहे. Joe Biden यांच्या सभेचा Sharad Pawar यांच्या सातारा सभेशी संबंध जोडत रोहित पवार यांनी बांधला अमेरिकेतही सत्तांतर अंदाज; पहा ट्विट.

दरम्यान जो बायडन हे 79 वर्षीय असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार आहेत. ते जिंकल्यास अमेरिकेचे ते सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उप राष्ट्रपतीपदासाठी आहेत. तसेच ट्रम्प ही निवडणूक हरल्यास 1992 नंतर राष्ट्राध्यक्ष पदाची दुसर्‍या टर्मची निवडणूक हरणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.