Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

जगात असे अनेक खतरनाक गुन्हेगार आहेत, ज्याबद्दल वाचूनच अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका अशा गुन्हेगाराची चर्चा आहे ज्याने माणुसकीला काळीमा फासला आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीने तब्बल 100 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला आहे. याशिवाय त्याने 2 जिवंत मुलींवर बलात्कार करून त्यांची निर्दयीपणे हत्या केली आहे. डेव्हिड फुलर (David Fuller) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. बुधवारी, ब्रिटनच्या मेडस्टोन क्राउन कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. डेली स्टारने याबाबत वृत्त दिले आहे.

डेव्हिडचा मृत्यू तुरुंगातच होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. डेव्हिडने इस्पितळात 100 अधिक मृतदेहांसोबत लैंगिक कृत्ये केल्याचे ऐकून न्यायालयालाही धक्का बसला. 10 वर्षांच्या कालावधीत त्याने हे कृत्य केले आहे. बुधवारी, 25 वर्षीय वेंडी नेल आणि 20 वर्षीय कॅरोलिन पियर्स यांच्यावर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी डेव्हिड दोषी आढळला होता. ही घटना 1987 सालातील केंट, इंग्लंडमधील आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस डेव्हिडच्या पोहोचले, तेव्हा त्यांना त्याच्या कॉम्प्युटरमधून धक्कादायक व्हिडिओ सापडले होते. या व्यक्तीने 9 आणि 16 वर्षांच्या मुलींच्या मृतदेहासोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यावेळी पोलिसांकडे 1987 मधील दोन्ही मृत्यूंशी संबंधित डीएनए नमुनेही होते. डेव्हिडची डीएनए तपासणी केली असता त्यानेच दोन्ही मुलींची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. (हेही वाचा: North Korea मध्ये Kim Jong Il च्या 10व्या पुण्यतिथी निमित्त 10 दिवसांचा दुखवटा; हसण्यावरही बंदी)

डेव्हिडच्या सामानाची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याचे ओळखपत्रही सापडले. तो टेक्निकल सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्यावेळी मृतदेहासोबतचे वेगवेगळे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड म्हणून ठेवले होते. 1980 च्या दशकात त्याने रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली. 2008 ते 2020 या दहा वर्षांच्या काळात त्याने 100 हून अधिक महिलांच्या मृतदेहावर बलात्कार केला.