North Korea मध्ये Kim Jong Il च्या 10व्या पुण्यतिथी निमित्त 10 दिवसांचा दुखवटा; हसण्यावरही बंदी
Kim Jong Un (Photo Credit: PTI)

नॉर्थ कोरिया (North Korea) मध्ये Kim Jong II या माजी सर्वोच्च नेत्यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त कडक निर्बंध नागरिकांवर घालण्यात आली आहे. 10 दिवसांच्या दुखवट्यामध्ये 'हसण्या'वर देखील बंदी घालण्यात आली आहे. 17 डिसेंबर ही Kim Jong II ची पुण्यतिथी दिवस आहे.  यासोबतच मद्य सेवन, ग्रॉसरीची शॉपिंग, आरामदायी अ‍ॅक्टिव्हीज याची नॉर्थ कोरियामधील नागरिकांना परवानगी नसेल असे Sinuiju च्या बॉर्डर वरील एका शहरातील नागरिकाने Radio Free Asia ला सांगितल्याचं इंडिया टुडे चं वृत्त आहे.

नागरिकच्या माहितीनुसार, दुखवट्याच्या दहा दिवसांमधील निर्बंधांचं कुणी उल्लंघन केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. एका व्यक्तीने आपली ओळख लपवत दिलेल्या माहितीमध्ये यापूर्वी दुखावटयाच्या काळात जी लोकं दारूच्या नशेत किंवा मद्यसेवन करताना दिसली अअहेत त्यांना अटक करून त्यांना आयडॉलॉजिकल क्रिमिनल म्हणून वागवण्यात आले आहे. त्यांना घेऊन जाण्यात आले आणि त्यानंतर ते पुन्हा कधी दिसलेले नाहीत.

दुखवटा काळात अंत्यविधी, वाढदिवसांचं सेलिब्रेशन आणि अन्य सेवांवरही निर्बंध आहेत. अजून एकाच्या माहितीनुसार डिसेंबर 2021 च्या सुरूवातीलाच पोलिसांनी निर्बंध घालण्यास सुरूवात केली होती ज्याने करून दुखवटा काळात नागरिकांमध्ये तो मूड सेट करायला मदत होईल. हे देखील वाचा: Kim Jong Un यांच्यासारखी नागरिकांनी नक्कल करु म्हणून नॉर्थ कोरियात Leather Coat वर बंदी .

नॉर्थ कोरिया कडून Kim Jong Il च्या आयुष्यावर काही कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांचे फोटो डिस्प्ले केले जाणार आहेत. ‘Kimjongilia’चं एक्झिबिशन असणार आहे.