युरोपामध्ये कोरोना वायरसचं वाढतं थैमान पाहता आता ब्रिटन मध्येही दुसरा 'स्टे अॅट होम' लॉकडाऊन (Stay-at-Home Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान काल युकेचे पंतप्रधान Boris Johnson यांनी त्याबद्दल घोषणा केली आहे. संपूर्ण इंग्लंड मध्ये 5 नोव्हेंबरपासून हा लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. पुढील 4 आठवडे म्हणजे महिन्याभरासाठी हा लॉकडाऊन असेल अशी त्यांनी माहिती देताना कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा या दुसर्या लाटेमध्ये बळींची संख्या अधिक असू शकतेे असे देखील कयास लावले जात आहेत. UK Sex Ban: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम.
शनिवारी 10 Downing Street वरून माहिती देताना, सध्या निसर्गचक्रासमोर झुकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कोरोनाबळींची संख्या पाहता आता हा लॉकडाऊनचा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. असे सांगत Boris Johnson यांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. COVID-19 Vaccine: 'कोविड ला रोखण्यासाठी आपल्याकडे ठोस लस उपलब्ध असेल की नाही याची अजूनही खात्री नाही' UK Taskforce Chief यांचं मत.
इंग्लंड मधील कोरोना लॉकडाऊनच्या काळात जे वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत त्यांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच शिक्षण संस्थांना सूट असेल. शाळा, कॉलेज सुरू राहणार आहेत. मात्र पब, बार, रेस्टॉरंट तसेच नॉन इसेन्शिएअल शॉप्स हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेक अवेची सोय खुली असेल. तसेच घराबाहेर केवळ एकाच व्यक्तीला भेटण्याची मुभा असेल.
दरम्यान 2021 च्या सुरूवातीपर्यंत कोरोना परिस्थिती निवळण्याची शक्यता सध्या कमी आहे. दरम्यान युरोपामध्ये सर्वत्रच कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचं आढळलं आहे. जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियममध्येही कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे.