Nadine Dorries (Photo Credits: Twitter)

चीनमधून (China) पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) सध्या जगभरात थैमान घालत आहे. जपान, इटली, इराण, अमेरिका, भारत या देशांसह ब्रिटनमध्येही कोरोना व्हायरस पसरला आहे. ब्रिटनच्या आरोग्यमंत्री (UK Health Minister) नदीन डॉरिस (Nadine Dorries) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले आहे. तसंच गेल्या काही दिवसांत त्यांनी भेट घेतलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्या अनेक लोकांच्या संपर्कात आल्या असून त्यांनी Downing Street Reception मध्ये पंतप्रधान  बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांचीही भेट घेतली होती. (इराण: कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मिथेनॉल प्राशन केलेल्या 27 जणांचा मृत्यू)

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या नदीन डॉरिस या पहिल्या राजकीय नेत्या आहेत. डॉरिस यांनी यासंबंधित माहिती देताना सांगितले की, "माझ्याशी संपर्क झालेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याचे काम पब्लिक हेल्थ इंग्लंडने सुरु केले आहे. तसंच संसदीय कार्यालय देखील बंद ठेवण्यात आले आहे." (Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसचा धोका सर्वात अगोदर सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू)

आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचे 373 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृत्यू झालेल्यापैकी एक व्यक्ती 80 वर्षांची असून त्यांची प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे आजारी व्यक्तींकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ब्रिटिश मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांना सूचित केले आहे.