Donald Trump And Robert O'Brien (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायनला (Robert O'Brien) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लक्षणे दिसत असून त्यांनी स्वत:चे विलगीकरण केले आहे. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमधूनच आपल्याला रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्ट ओ ब्रायन गेल्या काही दिवासांपूर्वी युरोपमधून परतले होते. युरोपमध्ये गेले असताना रॉबर्ट ओ ब्रायन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युके,फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमधील काही अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. दरम्यान, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत त्यांनी चेहऱ्याला मास्क लावला नसून सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसले होते. हे देखील वाचा- रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लक्षणं दिसत असून त्यांनी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांमधूनच आपल्याला रॉबर्ट ओ ब्रायन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे.

एए़नआयचे ट्वीट-

कोरोनाचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. त्यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक लागतो. जगभरात 1 कोटी 65 लाख 25 हजार 134 जणांना कोरोना झाला आहे. यापैकी 43 लाख 92 हजार 830 कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. ब्राझील येथे 24 लाख 23 हजार 798 तर, भारतात 14 लाख 79 हजार 277 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.