Sri Lanka Serial Blasts Update: श्रीलंकेच्या राजधानीत आज (21 एप्रिल) ईस्टर संडेच्या (Easter Sunday) सकाळी सहा सीरीअल बॉम्ब ब्लास्ट झाले. प्रामुख्याने चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये हे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर पुन्हा दुपारी कोलंबोमध्ये (Colombo) अजून बॉम्ब ब्लास्ट सुरू झाल्याचे वृत्तसमोर आले आहे. सध्याच्या माहितीनुसार दोन नवे ब्लास्ट झाले आहेत. कोलंबो येथील St. Sebastian’s Church in Negombo येथे नवा बॉम्बब्लास्ट झाल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. स्थानिक वृत्ताच्या माहितीनुसार या सातव्या बॉम्ब ब्लास्टमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ANI ट्विट
#UPDATE AFP News Agency quoting police: Eighth blast hits Sri Lankan capital. https://t.co/MabzUBcVcU
— ANI (@ANI) April 21, 2019
आज ईस्टर संडे असल्याने मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये येऊन येशूची प्रार्थना करतात. गुड फ्रायडेला येशूला सुळावर चढवले आणि त्याचा मृत्यू झाला पण पुढच्या तिसर्याच दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आजचा सण ख्रिस्ती बांधवांसाठी महत्त्वाचा असतो. कोलंबोमध्येही आज ईस्टर संडेच्या सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी लोकांना लक्ष्य करण्यात आले. स्थानिक माहितीनुसार बॉम्बहल्ल्यात 35 हून अधिक विदेशी नागरिकदेखील ठार झाले आहेत. Sri Lanka Serial Blasts: श्रीलंका येथील साखळी बॉम्ब स्फोटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध, भारतीयांसाठी हेल्पलाइन सुरु
भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने, दूतावास कार्यालयाने खास +94777903082, +94112422788, +94112422789, +94777902082, +94772234176 हेल्प लाईन सेवा सुरू केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील या हल्ल्यामधील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आज पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो अशा आशयाचे ट्विट करून श्रीलंकेच्या पाठीशी उभे असल्याचं सांगितले आहे.