Sri Lanka Serial Blasts (Photo Credits: File Photo)

श्रीलंकेमध्ये आज ईस्टर संडेची (Easter Sunday) सुरूवात सहा साखळी बॉम्बच्या (Sri Lanka Serial Blasts) धक्कादायक बातमीने झाली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये  चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हे बॉम्बहल्ले घडवण्यात आले आहे. यामध्ये सध्याच्या वृत्तानुसार,  130 ठार तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज या  हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्विटर्वरून माहिती देताना त्यांनी आपण श्रीलंकेच्या हल्ल्याचा निषेध करतो तसेच भारत देश श्रीलंकेच्या पाठीशी उभा आहे. अशा आशयाचे ट्विट केले आहे. ईस्टर सणाच्या दिवशी श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट

नरेंद्र मोदी यांचे  ट्विट 

नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील साखळी बॉम्ब स्फोटाचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली आणि जखमींसोबत आपल्या प्रार्थना असल्याचे सांगितले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजदेखील या हल्ल्यानंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासासोबत संपर्कात आहेत.

हेल्पलाईन नंबर्स 

कोलंबोमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये विदेशी पर्यटकांवरही हल्ला झाल्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.