इराणमध्ये (Iran) एका महिलेला एका भयानक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या महिलेने पतीवर चाकूने वार करून त्याचा खून केला. यानंतर तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवले. या महिलेला 5 वर्षांची मुलगी आहे. इराणमधील इस्लामशहर येथे शनिवारी (13 ऑगस्ट 2022) रोजी, पोलिसांनी या 22 वर्षीय महिलेला तिच्या घरातून पतीच्या शरीराचे तुकडे सापडल्यानंतर अटक केली. आरोपी महिलेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली होता.
या नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांना आरोपीच्या घरातून विकृत अवस्थेत तिच्या पतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी तीला अटक केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला अफगाणिस्तानची रहिवासी आहे. आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते. तिचा पती तिला आणि मुलीला मारहाण करत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पतीची हत्या केल्याचे तिचे म्हणणे आहे.
आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार वयाच्या 15 व्या वर्षी तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. महिलेच्या पतीने लग्नाच्या रात्रीच तिला सांगितले होते की, त्याला तिच्यात रस नाही आणि त्याचे इतर महिलांशीही संबंध आहेत. तिच्या पतीने तिची एकदा नव्हे तर अनेक वेळा फसवणूक केल्याचे तिने सांगितले. पतीकडून होत असलेली मारहाण, शिव्या, त्याचे अवैध संबंध अशा वागण्याला ही महिला कंटाळली होती.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडला त्यांच्या घरी पाहिले होते. पतीची प्रेयसी निघून गेल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी झाली. या दरम्यान रागाच्या भरात पतीने चाकू आणला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली व त्यात महिलेले पतीच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर पती जमिनीवर पडला. मात्र, पतीच्या मृत्युनंतर तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे का शिजवले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: Girlfriend जेलमध्ये कैदी Boyfriend ला गेली भेटायला, Kiss केल्यानंतर तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल)
महिलेच्या पतीचे (मृत) वय 38-39 च्या आसपास होते. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. इस्लामशहरचे पोलीस प्रमुख कर्नल अली आगाकरखाने यांनी सांगितले की, ‘आरोपी महिलेने प्रथम विरोधाभासी विधाने केली, परंतु नंतर हत्याकांडाबद्दल तपशीलवार माहिती दिली. तिने दावा केला आहे की, पतीच्या बाहेरख्याली स्वभावामुळे, त्याच्या अवैध संबंधामुळे आपली त्याची हत्या केली.’