लंडन: भारतीय वंशाचा अवघा 15 वर्षीय रणवीर सिंग साधू ब्रिटन मधील Youngest Accountant
Ranveer Singh Sandhu (Photo Credits: Facebook)

Britain's Youngest Accountant: लंडनमध्ये अवघ्या 15 वर्षीय मुलाने शालेय अभ्यास करता-करता स्वतःची अकाऊंटसी फर्म सुरू केली आहे. रणवीर सिंग साधू (Ranveer Singh Sandhu) असं त्याचं नाव असून तो लंडनमधील सर्वात कमी वयाचा अकाऊंटंट (Youngest Accountant) ठरला आहे. रणवीर हा साऊथ लंडनमधील रहिवासी आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून तो काम करत आहे.  मुंबईकर 'अब्दुल्ल खान'ला Google चं 1.2 कोटीचं पॅकेज; ना जॉब अ‍ॅप्लिकेशन, ना IIT चा विद्यार्थी, पहा तरीही कशी मिळाली इतकी मोठी संधी

तीन वर्षांपासून अकाऊंटंसीमध्ये काम करणारा रणवीर अकाऊंटंसी फर्म सोबत शालेय शिक्षण घेत आहे. वयाच्या 25 वीशी पर्यंत त्याला 'मिलेनियर' होण्याचं लक्ष्य ठरवलं आहे. त्याला इतर तरूण उद्योजकांना मदत करायला आवडेल असेही तो म्हणाला. तसेच यासाठी प्रतितास 12-15 पौंड घेतले जातील असे म्हणाला आहे.

डेली मिररला दिलेल्या माहितीमध्ये रणवीर म्हणाला शाळा आणि व्यवसाय हे दोन्ही मी एन्जॉय करतो. रणवीरने ऑनलाईन अकाऊंटिंग कोर्स पूर्ण केला. त्यानंतर 2016 साली त्याने डिजिटल अकाऊंट्स मध्ये व्यवसायाला सुरूवात केली. त्यानंतर दोन वर्षातच त्याने दुसरी कंपनी सुरू केली.

वर्क फ्रॉम होममध्ये काम करतात. त्याचे कुटुंबीय रिअल इस्टेटचे एजंट्स म्हणून काम करतात. सुरूवातीपासूनच माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला आहे. या व्यवसायातून मला भरपूर पैसा कमावायचा आहे. असे तो म्हणाला.

लवकरच त्याच्या बचतीमधून त्याला हॉलिडे ट्रीप प्लॅन करायची आहे तसेच नवी कार घेण्याची इच्छा आहे. असेही तो म्हणाला.